"कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही..."; 'मुंब्रा हिरवा करू' म्हणणाऱ्या सहर शेखला सयाजी शिंदेंचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:36 IST2026-01-27T10:32:15+5:302026-01-27T10:36:57+5:30
सहर शेखने जाहीर सभेत 'मुंब्रा हिरवा करु', असं विधान केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. आता सहरच्या या वक्तव्यावर अभिनेते सयाजी शिंदेंनी त्यांची सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.

"कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही..."; 'मुंब्रा हिरवा करू' म्हणणाऱ्या सहर शेखला सयाजी शिंदेंचं सडेतोड उत्तर
सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. AIMIM ची नगरसेविका सहर शेखने ''कैसा हराया...'' म्हणत सहरने विरोधी पक्षांना डिवचलं होतं. याशिवाय सहर शेखने जाहीर सभेत 'मुंब्रा हिरवा करु', असं विधान केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. विविध स्तरांवर सहरला टीकेला सामोरं जावं लागलं. आता सहरच्या या वक्तव्यावर अभिनेते सयाजी शिंदेंनी त्यांची सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.
टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत सयाजी शिंदेंना याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले, ''कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही. सगळे रंग निसर्गाच्या बापाचे आहेत. निसर्ग आपलं मूळ आहे. त्याच्यामध्ये सगळे रंग आहेत. कोणाला आव आणून असं आणता येत नाही. ते आतून येतात आणि ते फक्त झाडांमधून येतात.''. अशाप्रकारे सयाजी शिंदेंनी त्यांची स्पष्ट प्रतिक्रया देऊन हिरव्या रंगाला निसर्गाचा संदर्भ दिला.
सहर शेख काय म्हणाली होती
महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सहर शेखने कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक विधान केले होते. ज्यात ती म्हणाली की, "हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करून टाकू. मुंब्र्यातून विरोधकांना पळवून लावू आणि इथला प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल," असं सहर शेखने म्हटलं. 'मुंब्रा हिरवा करू' या विधानावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली.