१२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मराठी अभिनेत्याचं गर्लफ्रेंडसोबत लग्न, म्हणाला- "आम्हाला वेगळं होण्याची भीती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:25 IST2025-09-30T10:20:45+5:302025-09-30T10:25:10+5:30
तब्बल १२ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मराठी अभिनेता गर्लफ्रेंडसोबत अडकला लग्नबंधनात. सर्वांकडून अभिनंदन

१२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मराठी अभिनेत्याचं गर्लफ्रेंडसोबत लग्न, म्हणाला- "आम्हाला वेगळं होण्याची भीती..."
मराठी सिनेसृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तब्बल १२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मराठी अभिनेता सारंग साठ्ये (Sarang Sathaye) लग्नबंधनात अडकला आहे. सारंगने त्याची गर्लफ्रेंड पॉला मॅकग्लेन (Paula Mcglynn) सोबत लग्न केलं आहे. २८ सप्टेंबरला दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाचे खास फोटो सारंग आणि पॉलाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दोघांनी फोटो शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी दोघांचंही अभिनंदन केलंय.
१२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर केलं लग्न
सारंगने सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन सारंग लिहितो की, ''होय, आमचं लग्न झालं! तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की, लग्न आमच्यासाठी कधीच प्राथमिकता नव्हती. पण, एकच गोष्ट होती जी आम्हाला वेगळं करू शकली असती, आणि ती म्हणजे 'एक कागद'. गेलं वर्ष खूप कठीण होतं. जगात खूप संघर्ष होता. द्वेष इतका वाढला होता की, पहिल्यांदाच आम्हाला वेगळं होण्याची भीती वाटली. पण, प्रेम नेहमीच द्वेषावर विजय मिळवतं.''
''आमचं प्रेम आणि आमची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी, आम्ही काल २८/०९/२०२५ रोजी, तो 'कागद' मिळवला. हा विवाह सोहळा अगदी खासगी होता. आमचे जवळचे कुटुंब आणि काही मित्र-मैत्रिणी 'डीप कोव्ह' (Deep Cove) येथील आमच्या आवडत्या झाडाजवळ जमले. आमच्या दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याची ही एक उत्तम संधी होती. आम्ही एकमेकांना आमच्या गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि यापुढेही प्रेमी आणि जिवलग मित्र म्हणून राहण्याचे वचन दिले! बस, हीच आहे आमची छोटीशी गोष्ट! प्रेम नेहमीच जिंकेल! (Love Will Always Win!)'', अशा शब्दात सारंग साठ्येने पोस्ट शेअर केली आहे.