"आईने काल बाबांना स्मार्ट फोन गिफ्ट केल्यावर.."; संतोष जुवेकरने सांगितला खास प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 14:49 IST2024-12-29T14:48:46+5:302024-12-29T14:49:13+5:30
मराठी अभिनेता संतोष जुवेकरने आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवशी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे (santosh juvekar)

"आईने काल बाबांना स्मार्ट फोन गिफ्ट केल्यावर.."; संतोष जुवेकरने सांगितला खास प्रसंग
अभिनेता संतोष जुवेकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. झेंडा, मोरया, एक तारा अशा सिनेमांमधून संतोषने त्याच्या अभिनयाची चुणुक सर्वांना दाखवली. काहीच दिवसांपूर्ववी संतोषची भूमिका असलेल्या रानटी सिनेमाचीही चांगलीच चर्चा रंगली. संतोष सोशल मीडियावर कायमच त्याच्या आयुष्याबद्दलचे अपडेट शेअर करत असतो. संतोषच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्ताने संतोषने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
संतोष लिहितो की, "काल आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आज मी post share करतोय कारण मला हवा तसा फोटो सापडत नव्हता आणि आज सापडला आणि त्यांचा हा फोटो मला खूप आवडलाय. आईने काल बाबांना smart phone gift केला आणि ती त्यांना तो कसा वापरायचा हे शिकवत होती आणि बाबा आईच नीट लक्ष देऊन ऎकत होते. अगदी असच ते लग्न झाल्यापासून आईचच लक्षदेवून ऎकत आले आहेत म्हणून आजही सुरक्षित आणि उत्तम आयुष्य जगतायत... "
संतोष पुढे सांगतो की, "आईने काल तिची लग्नातली आठवण share केली. तिने सांगितलं लग्न झाल्यावर सासरी जाताना तिची आई म्हणाली होती " आता तू आमची राहिली नाहीस आता तु तुझा संसार तू सांभाळ खंबीरपणे. हागल्या पदल्याला माहेरी यायचं नाही तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा.. पादा पण नांदा. " आणि आई बाबा मला तुमचा खूप अभिमान आहे तुम्ही दोघांनी करून दाखवलत, लढलात पडलात पुन्हां लढलात तुम्ही तुमच्या संसारासाठी अगदी आमच्या सकट जे केलं आहे ते खूप अमूल्य आहे आणि तुमच्या प्रेमाची आणि कष्टाची जाण आम्हाला कायम राहो हाच तुमचा आणि देवाचा आम्हाला आशिर्वाद लाभुदे.. i love u lottttttt.. नांदा सौख्यभरे"