"...तर वाईट परिणाम होतात"; सोशल मीडियाबाबत संकर्षण कऱ्हाडेने मांडलं परखड मत, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:56 IST2025-03-29T17:36:20+5:302025-03-29T17:56:21+5:30
"हे फुंकून प्यायचं ताक...", सोशल मीडियाबाबत संकर्षण कऱ्हाडेने मांडलं परखड मत, म्हणाला...

"...तर वाईट परिणाम होतात"; सोशल मीडियाबाबत संकर्षण कऱ्हाडेने मांडलं परखड मत, म्हणाला...
Sankarshan Karhade : मराठी चित्रपट तसेच नाटक, मालिकांच्या माध्यमातून कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडेला (Sankarshan Karhade) ओळखलं जातं. संकर्षण अभिनेत्यासोबत उत्तम लेखकदेखील आहे. सध्या रंगभूमीवर त्याचे ‘नियम व अटी लागू’ आणि ‘तू म्हणशील तसं’ ही दोन नाटके सुरू आहेत. याशिवाय त्याचं 'कुटुंब किर्रतन' हे नवीन नाटक लवकरच भेटीला येत आहे. यानिमित्ताने अभिनेत्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडिया किती लाभदायक, किती धोकादायक आहे. यावर भाष्य केलं.
संकर्षण कऱ्हाडेने 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत सोशल मीडियाच्या वापरावर आपलं मत मांडलं. दरम्यान, या मुलाखतीमध्ये अभिनेत्याला त्याच्या फॅनफॉलोइंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, "हे सगळं छान आहे पण सोशल मीडिया हे फुंकून प्यायचं ताक आहे. म्हणजे लहानपणी आपण एक खेळ खेळायचो या बोटावरचा थुक्का या बोटावर. आपल्याकडून जरा एखादं चुकीचं विधान किंवा जरा चुकीची पोस्ट, चुकीचं स्टेटमेंट गेलं तर त्याचे वाईट परिणाम होतात.
त्यानंतर अभिनेत्याने म्हटलं, त्याच्यामुळे हे माध्यम जपून वापरावं. चाहते आपल्यावर प्रेम करतात याचा मोठ्या मनाने स्विकार आहे, त्या प्रेमाची पात्रता कायम आपल्या अंगी राहावी ती वाढावी याचाच प्रयत्न आहे. पण, अर्थात याचा वापर जपून जपून करायला पाहिजे. असं अभिनेत्याने सांगितलं.