"पुणेकरांनो तुमचं मत वाया गेलं नाही", प्रविण तरडेंनी केल खासदार मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:30 IST2024-08-12T16:29:30+5:302024-08-12T16:30:14+5:30

प्रविण तरडे आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. अनेकदा प्रविण तरडे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर करतात.

marathi actor pravin tarde shared special post for pune mp murlidhar mohol | "पुणेकरांनो तुमचं मत वाया गेलं नाही", प्रविण तरडेंनी केल खासदार मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक

"पुणेकरांनो तुमचं मत वाया गेलं नाही", प्रविण तरडेंनी केल खासदार मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक

प्रविण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तर सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, देऊळ बंद, मुळशी पॅटर्न असे सुपरहिट सिनेमे त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. प्रविण तरडे आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. अनेकदा प्रविण तरडे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर करतात. 

आतादेखील प्रविण तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. दिल्लीत जाऊन तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. त्यांच्यासाठी त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबरचा व्हिडिओ प्रविण तरडेंनी शेअर केला आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट

मित्राचं यश , मैत्रीचा अभिमान ...

“शहरभर मुरलीधर" म्हणता म्हणता आपला “मुरलीधर देशभर" झाला...

तुमचे कष्ट , तुमची प्रामाणिकता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. आज मुरलीधर अण्णाला दिल्लीत जावून भेटलो...सहकार आणि नागरी विमान या दोन अत्यंत महत्वाच्या खात्यांचा तो केंद्रीय राज्यमंत्री आहे...

पुणेकरांनो तुमचं मत वाया नाही गेलं. आपला मुरलीधर पुण्यासोबतच संपूर्ण देशाचं काम बघतोय...मित्रा ही तर सुरवात आहे अजून तुला खूप मोठं व्हायचंय आपल्या पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी खुप काम करायचंय...


प्रवीण तरडेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, प्रवीण तरडे साऊथ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'अहो विक्रमार्का' असं सिनेमाचं नाव असून या सिनेमात ते खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ३० ऑगस्टला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: marathi actor pravin tarde shared special post for pune mp murlidhar mohol