महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक घेऊन प्रसाद ओकची लंडनवारी, पत्नी मंजिरीसोबतचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:57 IST2022-08-03T15:27:55+5:302022-08-18T13:57:58+5:30
प्रसाद आणि मंजिरी ओक यांचे लंडनमधील व्हॅकेशन दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक घेऊन प्रसाद ओकची लंडनवारी, पत्नी मंजिरीसोबतचे फोटो व्हायरल
भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. कामातून ब्रेक घेत अभिनेता प्रसाद ओक पत्नी मंजिरीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय.
प्रसाद सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. त्याने लंडनमधील व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. प्रसादने मंजिरीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्स केल्यात. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद ओक (prasad oak) आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak)
दरम्यान आज अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वतःचं स्थान निर्माण केलयं. नुकताच तो धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात प्रसादनं साकारलेले आनंद दिघे लोकांना भावले. प्रसाद सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतोय. यातून त्याने ब्रेक घेतला असले की काही भागांचे शूटिंग आधीच केलं असेल. मंजिरी ही प्रसादसोबत अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. शिवाय बिझनेस वुमन अशीही तिची ओळख आहे.