दहीहंडीत बेभान होऊन नाचणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांचा 'तो' व्हिडीओ पाहून प्रत्येकजण हळहळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:13 IST2022-08-10T13:00:43+5:302022-08-10T13:13:21+5:30
ज्या गिरगावात ते लहानचे मोठे झालं त्याठिकाणी त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. प्रदीप पटवर्धन यांचा गिरगावमधील एक व्हिडिओ समोर आला आहे.

दहीहंडीत बेभान होऊन नाचणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांचा 'तो' व्हिडीओ पाहून प्रत्येकजण हळहळलं
आपल्या अभिनयानं नाट्य आणि सीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं 9 ऑगस्ट रोजी निधन झालं. मुंबईतील गिरगावच्या राहत्या घरी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले... त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालंय.
प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात स्थायिक होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय साकारण्यास सुरूवात केली होती. ज्या गिरगावात ते लहानचे मोठे झालं त्याठिकाणी त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. प्रदीप पटवर्धन यांचा गिरगावमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. गिरगावात अजूनही प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या वर्षी दहीहंडी देखील उत्साहात साजरी केली गेली आणि यावेळी प्रदीप पटवर्धन नाचत होते. प्रदीप यांच्या हा व्हिडिओ अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. अनेकांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला व्हिडिओवर कमेंट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रदीप पटवर्धन यांची अकाली ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी आहे. रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा आता यापुढे दिसणार नाही, याचे अतिशय वाईट प्रत्येत गिरगावकराला वाटतेय.
प्रदीप यांचं ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांची भूमिका अतिशय गाजली. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘एक दोन तीन चार’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’ अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. केवळ चित्रपट नव्हे तर नाटक, मालिकाही त्यांनी गाजवल्या.