"मला कामही मिळत नाही आणि...", ज्येष्ठ अभिनेत्यावर उतारवयात ओढावलं आर्थिक संकट, दु:ख व्यक्त करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:46 IST2025-06-18T17:44:17+5:302025-06-18T17:46:55+5:30
"जर स्वेच्छामरण नाही मिळालं तर...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी मांडली व्यथा, काय म्हणाले?

"मला कामही मिळत नाही आणि...", ज्येष्ठ अभिनेत्यावर उतारवयात ओढावलं आर्थिक संकट, दु:ख व्यक्त करत म्हणाले...
Manmohan Mahimkar: मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हे कामाच्या शोधात आहेत. काहींच्या हाती काम नसल्याने त्यांच्यावर अशातच मराठी सिनेइंडस्ट्रीतील एका ज्येष्ठ अभिनेत्याला उतारवयात काम मिळत नसल्याने त्यांचं जगणं देखील मुश्किल झालं आहे. हे अभिनेते म्हणजे मनमोहन माहिमकर (Manmohan Mahimkar) आहेत. 'लोकमत फिल्मी'च्या 'द अनटोल्ड स्टोरी' कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली व्यथा मांडत मनातील दु: ख व्यक्त केलं आहे.
अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी त्याबरोबरच अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्येही ते झळकले होते. हातात काम नसल्यामुळे त्यांच्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना ते म्हणाले- "स्वेच्छामरण घ्यावं लागलं का? कारण मला जागेचं ठिकाण नाही कोर्टात केस, परत मला कामही मिळत नाही आणि Income काही नाहीये आणि महागाई वाढत चाललेली आहे. जसे दिवस जास्त जातात तशी महागाई वाढते आणि मला Income काय मिळत नाही व्याजाचा दर सुद्धा कमी झालेला आहे. माझ्याकडे जास्त पैसे पण नाहीयेत त्यामुळे आता मी स्वेच्छामरण मागितलं आहे. जर स्वेच्छामरण नाही मिळालं तर माझी अवस्था अशी होईल, एक दिवस मला मंत्रालयातून उडी सुद्धा मारावी लागेल अशी सुद्धा माझी वेळ येईल. अशी वेळ येऊ नये म्हणून मी माझ्या शिर्डीच्या साईबाबांना साकडं घालतो. माझ्या अक्कलकोट स्वामींना नेहमी मी साकडं घालतं असतो. बाबा! मला खाली उडी मारायची बुद्धी देऊ नका माझ्यासाठी काहीतरी चांगलं होईल असं करा. मला खूप त्रास होतोय मला कोर्टातून सुटका करू द्या मला सीरीयल, पिक्चरमध्ये काम मिळू द्या अजूनही मी कुठे पण जातो दरवर्षी मी एकटा शिर्डीला जातो साईबाबांकडे
पुढे मनमोहन माहिमकर म्हणाले,"मला वाईट वाटतं आता कधी मला चांगले दिवस येतील याची मला वाट पाहावी लागते का, असंच अर्धवट मी मरणार आहे. असंच अर्धवट मी मरू नये माझ्या कार्याला मला यश द्या गणपतीराया माझं काय चुकलं असेल त्या चुकीला क्षमा करून मला काहीतरी अजूनही संधी द्या पुढे यायची अशी मी इच्छा प्रकट करतो." असं म्हणत मनमोहक माहिमकर यांनी आपली व्यथा मांडली आहे.
दरम्यान, मनमोहन माहिमकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी ‘ही पोरगी कुणाची’ चित्रपटात निर्मिती सावंत यांच्या भावाची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘छत्रपती ताराराणी’, ‘जत्रा’, यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे.