जितेंद्र जोशीने दाखवली बोमन ईरानींच्या बर्थडे पार्टीची झलक, दोघांमध्ये आहे खास मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 10:24 IST2023-12-03T10:23:33+5:302023-12-03T10:24:54+5:30

जितेंद्रच्या बायकोची अभिषेक बच्चनला भेटण्याची इच्छा पूर्ण झाल्याचंही त्याने लिहिलं आहे.

marathi actor Jitendra Joshi attended boman irani s birthday party both are good friends | जितेंद्र जोशीने दाखवली बोमन ईरानींच्या बर्थडे पार्टीची झलक, दोघांमध्ये आहे खास मैत्री

जितेंद्र जोशीने दाखवली बोमन ईरानींच्या बर्थडे पार्टीची झलक, दोघांमध्ये आहे खास मैत्री

मराठी अभिनेता, लेखक जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) म्हणजे अतिशय प्रतिभावान कलाकार. आपल्या टॅलेंटने त्याने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. नुकतीच त्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे जी सध्या व्हायरल होत आहे. अभिनेते बोमन ईरानी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. यामध्ये अभिषेक बच्चन आणि फराह खानही दिसत आहेत. बायकोची अभिषेक बच्चनला भेटण्याची इच्छा पूर्ण झाल्याचंही त्याने लिहिलं आहे.

काय आहे जितेंद्रची पोस्ट?

'काही वर्षांपूर्वी मी स्वप्नातही कल्पना केली नसती की मी त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजर राहील जो माझ्या फक्त एक फोन कॉल दूर आहे. माझ्या क्षमतेचा किंवा टॅलेंटचा काही संबंध नाही पण बोमन ईरानी या अप्रतिम माणसाची कला आणि कलाकाराबद्दल असलेली आपुलकी हेत सर्वकाही आहे. बोमन, त्यांची पत्नी आणि मुलं सर्वांचीच इतकी आपुलकीने काळजी घेतात की हळहळू तुम्ही त्यांच्या कुटुंबाचाच भाग बनून जाता. आज त्यांनी मला पुन्हा एकदा सुंदर क्षण दिले आहेत ज्यामुळे हे जग सुंदर असल्याची जाणीव मला होत आहे.' वाढदिवसाच्या शुभेच्छा बोमन सर. तुम्ही आम्हाला तुमच्या कुटुंबाचा भाग करुन घेतल्याबद्दल आभार झेनोबिया काकी. आणि हो, माझ्या बायकोचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल अभिषेक बच्चनचे आभार.'

या पोस्टवरुन जितेंद्र जोशी आणि बोमन ईरानी यांच्यात किती सुरेख मैत्रीचं नातं आहे हे स्पष्ट होतंय. काल २ डिसेंबर रोजी बोमन ईरानी यांच्या वाढदिवसाला जितेंद्र जोशी पत्नीसह त्यांच्या घरी गेला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील खास फोटो, व्हिडिओ जितेंद्रने शेअर केले आहेत आणि ही सुंदर पोस्ट लिहिली आहे. तसंच त्याच्या पत्नीचं अभिषेक बच्चनला भेटण्याचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. जितेंद्रच्या पोस्टचं चाहत्यांनी कौतुक केलं असून शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: marathi actor Jitendra Joshi attended boman irani s birthday party both are good friends