रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, "मुंबई महानगरपालिका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 15:21 IST2023-09-14T15:19:05+5:302023-09-14T15:21:42+5:30

मुंबईच्या वाहतूक कोंडीने मराठी अभिनेता त्रस्त, फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

marathi actor hemant dhome angry reaction on mumbai traffice shared photo | रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, "मुंबई महानगरपालिका..."

रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, "मुंबई महानगरपालिका..."

मुंबईतील वाहकूक कोडींची समस्या काही नवी नाही. कामाच्या वेळी बऱ्याचदा वाहतुक कोडींमुळे सामान्य नागरिकांचा खोळंबा होता. पण केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे तर कलाविश्वातील सेलिब्रिटींनाही मुंबईतील वाहतुकीच कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा मराठीबरोबरच हिंदी कलाविश्वातील कलाकारांनी मुंबईच्या ट्राफिकबाबत सोशल मीडियावरुन भाष्य केलं आहे. इतर कलाकार आणि सामान्य नागरिकांप्रमाणेच प्रसिद्ध मराठी अभिनेता हेमंत ढोमेही मुंबईच्या वाहतुक कोंडीमुळे त्रस्त आहे.

हेमंत ढोमे हा मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. हेमंतने अनेक चित्रपटांत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अभिनेता असण्याबरोबरच तो उत्तम दिग्दर्शकही आहे. हेमंत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील घडामोडींवर तो अनेकदा ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. आता मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत हेमंतने केलेली पोस्ट चर्चेत आहे. हेमंतने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन मुंबईतील ट्राफिकचा एक फोटो शेअर केला आहे. “मुंबई महानगरपालिका सादर करत आहे ट्रॉपीक! वेळ – रोज, स्थळ – सर्वत्र” असं हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“सुशांतबरोबर खूप वाईट घडलं”, उषा नाडकर्णी भावुक, म्हणाल्या, “कितीही पैसे दाबले तरी त्यांना...”

"अजित पवार की देवेंद्र फडणवीस? प्रभावी उपमुख्यमंत्री कोण?" सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

हेमंत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डेट भेट’ चित्रपटात झळकला होता. त्याने दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा’ हा चित्रपटही खूप गाजला होता. या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘सनी’ हे चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत.

Web Title: marathi actor hemant dhome angry reaction on mumbai traffice shared photo