Trailer: 'घरात घुसून डाव करीन त्याचा'; हार्दिकच्या ॲक्शनपॅक्ड Club 52 चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 11:50 IST2023-12-07T11:49:43+5:302023-12-07T11:50:24+5:30

Club 52 Trailer: प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये हार्दिक पहिल्यांदाच ॲक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

marathi actor hardeek joshi upcoming movie Club 52 Trailer out | Trailer: 'घरात घुसून डाव करीन त्याचा'; हार्दिकच्या ॲक्शनपॅक्ड Club 52 चा ट्रेलर रिलीज

Trailer: 'घरात घुसून डाव करीन त्याचा'; हार्दिकच्या ॲक्शनपॅक्ड Club 52 चा ट्रेलर रिलीज

सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वात अनेक दर्जेदार आणि उत्तम कथानक असलेल्या सिनेमांची निर्मिती होत आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये असंख्य सिनेमांची रेलचेल असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच आता तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी याचा क्लब 52 हा दमदार सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये हार्दिक जबरदस्त भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी क्लब 52 या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा ट्रेलर रिलीज झाला असून यात हार्दिक आणि भाऊ कदम यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये 'क्लब 52'  या सिनेमाची 'एक डाव नियतीचा' अशी टॅगलाईन आहे. हा सिनेमा कसिनो आणि दोन मित्रांमधील मैत्री यांच्यावर आधारित असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. चित्रपटात अॅक्शन सीनचा भरमार आहे, शिवाय संवादही खटकेबाज आहेत. काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय उत्तम झाल्याचं दिसतो आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीजरमुळे या चित्रपटानं आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. या सिनेमात हार्दिक जोशी मुख्य भूमिका साकारत आहे. तर, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे.  

दरम्यान, १५ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या या सिनेमाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत या सिनेमाचं दिग्दर्शन अमित वाल्मिक कोळी केलं आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे.  

Web Title: marathi actor hardeek joshi upcoming movie Club 52 Trailer out