मराठी अभिनेत्याची मान गर्वाने उंचावली! Forbesच्या ‘४० अंडर ४०’मध्ये बहिणीला स्थान, म्हणतो- "इतक्या वर्षांचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:24 IST2026-02-24T15:22:24+5:302026-02-24T15:24:24+5:30

धैर्यच्या लाडक्या बहिणीने मानाच्या फोर्ब्स इंडिया २०२६ च्या ‘४० अंडर ४०’ या यादीत स्थान मिळवलं आहे. सोशल मीडियावरून धैर्यने ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

marathi actor dhairya gholap sister snehal gholap awarded with forbes 40 under 40 list | मराठी अभिनेत्याची मान गर्वाने उंचावली! Forbesच्या ‘४० अंडर ४०’मध्ये बहिणीला स्थान, म्हणतो- "इतक्या वर्षांचा..."

मराठी अभिनेत्याची मान गर्वाने उंचावली! Forbesच्या ‘४० अंडर ४०’मध्ये बहिणीला स्थान, म्हणतो- "इतक्या वर्षांचा..."

मराठमोळा अभिनेता धैर्य घोलप सध्या चर्चेत आला आहे. धैर्यच्या लाडक्या बहिणीने मानाच्या फोर्ब्स इंडिया २०२६ च्या ‘४० अंडर ४०’ या यादीत स्थान मिळवलं आहे. सोशल मीडियावरून धैर्यने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. धैर्यने त्याच्या बहिणीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. फोर्ब्स इंडिया २०२६ च्या ‘४० अंडर ४०’ यादीत बहीण स्नेहल घोलप हिने स्थान मिळवल्याने अभिनेत्याची मान गर्वाने उंचावली आहे. 

त्या पोस्टमध्ये धैर्यने लिहिलंय की, “फोर्ब्स ४० अंडर ४० च्या प्रतिष्ठित लिस्टमध्ये माझ्या बहिणीचं नाव झळकलं व पुरस्कार घरी आला आणि माझ्या डोळ्यासमोरून इतक्या वर्षांचा फ्लॅशबॅक गेला. माझे बाबा बोर्डात आले होते. त्यामुळे साहजिकपणे त्यांच्या माफक अपेक्षा अश्या होत्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी अभ्यासात कधी मागे पडू नये. त्यामुळे ते आमच्या लहानपणापासून आम्हाला जमेल त्या पद्धतीने अभ्यासात गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचे. त्यात आमची ताई कायम त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायची आणि पुस्तकांमध्ये हरवलेली असायची. (आजदेखील तसंच चित्र आहे म्हणा) आम्ही शाळा-कॉलेज मध्ये असताना बाबा सकाळी ५ वाजता उठायचे. आम्हाला ड्रायफ्रूट्स आणि गरम दूध करून ठेवायचे. मग आम्हाला उठवायचे आणि अभ्यासाला बसवायचे आणि मग ऑफिसला जायचे. 


"एखाद्या गोष्टीची तपश्चर्या आणि कठोर मेहनत करत नाही तोपर्यंत यश साध्य होणे नाही. जे करायचं आहे ते प्रचंड प्रामाणिकपणे करा. जीव तोडून मेहनत केली तर सगळं साध्य होऊ शकतं...होत नाही, जमत नाही म्हणजे काय? लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं असावं, ही त्यांची शिकवण होती. ताईला तेव्हाच कळालं होतं हे त्यामुळे तिने नंबरात येणं कधी सोडलं नाही. ती बिचारी मन लावून इंग्रजी, गणित, विज्ञान असे कठीण विषय बाबांकडून शिकतदेखील बसायची. तेव्हा मला ते दंगलमधल्या आमीर खानसारखे वाटायचे आणि ते माझ्याकडे तारे जमीन पर मधल्या इशान अवस्थी सारखे बघायचे. फारच अविस्मरणीय आणि गमतीशीर दिवस होते ते", असं त्याने म्हटलं आहे. 

पुढे त्याने लिहिलंय, “ह्या सगळ्या शिकवणीचा अर्थ वय वाढत गेलं तसा उलगडायला लागला. क्षेत्र कोणतं का असेना यश मिळवायचंय तर तपश्चर्येला पर्याय नाही. आज आम्ही दोघेही भावंडं त्यांनी दिलेल्या शिकवणीवर विश्वास ठेवून आपापल्या क्षेत्रात मेहनतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत यश मिळो वा अपयश प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे सुरू असतात. आई म्हणत होती मुलाला पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअर मिळाला आणि आता मुलीला फोर्ब्स च्या टॉप ४० अंडर ४० मधे मान...आज बाबा जाऊन १५ वर्ष झाली. ते आज असते तर त्यांना हे चित्र पाहून अतिशय आनंद झाला असता. तर माझ्या आई बाबांसारखाच मलादेखील माझ्या बहिणीचा प्रचंड अभिमान आहे. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा”. 
 

Web Title : मराठी अभिनेता गर्वित, बहन फोर्ब्स '40 अंडर 40' में शामिल।

Web Summary : अभिनेता धैर्य घोलप ने अपनी बहन स्नेहल के फोर्ब्स इंडिया की '40 अंडर 40' सूची में शामिल होने पर खुशी जताई। उन्होंने अपने बचपन और बहन के समर्पण को याद करते हुए एक पोस्ट साझा किया, जो उनके पिता के मूल्यों से प्रेरित था। उन्हें अपनी बहन पर बहुत गर्व है।

Web Title : Marathi actor proud as sister features in Forbes '40 Under 40'.

Web Summary : Actor Dhairya Gholap celebrates his sister Snehal's inclusion in Forbes India's '40 Under 40' list. He shares a heartfelt post recalling their upbringing and his sister's dedication, instilled by their father's values of hard work and perseverance. He expresses immense pride in her achievement.