'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:37 IST2024-09-18T11:36:32+5:302024-09-18T11:37:45+5:30
अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत राजकीय नेते शरद पवार यांच्यासोबत घडलेला खास किस्सा शेअर केलाय (ashok saraf)

'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा
अशोक सराफ हे भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते. अशोक सराफ यांनी आजवर विविध माध्यमांत काम करुन लोकांना खळखळून हसलवलंय. अशोक सराफ यांनी हिंदी, मराठी मनोरंजन विश्वातील विविध सिनेमांत भूमिका साकारल्या आहेत. अशोक सराफ यांनी केवळ सिनेमात नव्हे तर 'हम पाँच' सारख्या मालिकेतही अभिनय करुन प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. अशोक यांनी नुकतंच राजकारणातील अनुभवी नेते शरद पवार यांच्यासोबतचा मजेशीर अनुभव शेअर केलाय.
शरद पवार यांच्यासोबतच अशोक यांचा खास किस्सा
अशोक सराफ यांनी foucusedindian या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा खास किस्सा सांगितला. कधी फक्त चेहऱ्याकडे बघून कोणाला हसू आलंय का असा प्रश्न अशोक सराफ यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, "हो असं झालंय. मी भूमिकाच अशा केल्यात की त्याचा परिणाम म्हणजे लोकांना माझ्याकडे पाहून हसायला येतं. शरद पवारांसारखा माणूस माझ्याकडे बघून हसला म्हणजे काय बोलायचं. शरद पवारांसारखा गंभीर व्यक्तिमत्वाचा माणूस मला पाहताच हसायला लागले.
अशोक सराफ पुढे म्हणाले, "मी त्यांच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो. पुढे स्टेजवर त्यांना भेटायला गेलो. फोटो काढले. आणि शरद पवार माझ्याकडे बघून हसले. मी त्यांना म्हटलं साहेब, तुम्ही अजूनही ओळखता वाटतं मला." अशाप्रकारे अशोक सराफ यांनी ही मजेशीर आठवण मुलाखतीत सांगितली. अशोक सराफ लवकरच सचिन पिळगावकर यांच्यासोबत 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये सिनेमात काम करणार आहेत. हा सिनेमा काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.