बऱ्याच वर्षांनी समोर आला अशोक -निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा अल्बम; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 15:52 IST2023-07-23T15:50:50+5:302023-07-23T15:52:19+5:30
Ashok saraf: अशोक सराफ यांनी १९९० मध्ये निवेदिता यांच्यासोबत लग्नगाठ बांधली

बऱ्याच वर्षांनी समोर आला अशोक -निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा अल्बम; पाहा फोटो
मराठी कलाविश्वातील पॉवरफूल कपल म्हणजे अशोक सराफ (ashok saraf) आणि निवेदिता सराफ (nivedita saraf) . गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. बऱ्याच सिनेमांमध्ये या जोडीने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडते. पडद्यावर एकमेकांची साथ देणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांची साथ देत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.
अशोक सराफ यांनी १९९० मध्ये निवेदिता यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या जोडीचा विवाहसोहळा दणक्यात पार पडला. विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतर त्यांच्या लग्नाचा अल्बम समोर आला आहे.
अशोक सराफ यांच्या एका फॅनपेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक-निवेदिता यांच्या लग्नातील काही फोटो कोलाज केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांना टॅगही करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी ही जणू एक पर्वणीच झाली आहे. या व्हिडीओमध्ये अशोक-निवेदिता यांच्या सप्तपदी, जेवणाची पंगत असे कितीतरी विधी पार पडत असल्याचं दिसून येत आहे.