"तू कितनी अच्छी है... ",'या' हृदयस्पर्शी गाण्यातील बालकलाकार आठवतोय? आता आहे मराठीतील नामांकित दिग्दर्शक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:44 IST2025-09-29T15:39:32+5:302025-09-29T15:44:28+5:30
"तू कितनी अच्छी है... ",'या' हृदयस्पर्शी गाण्यातील बालकलाकार आठवतोय? आता आहे मराठीतील नामांकित दिग्दर्शक, तुम्हाला माहितीये का?

"तू कितनी अच्छी है... ",'या' हृदयस्पर्शी गाण्यातील बालकलाकार आठवतोय? आता आहे मराठीतील नामांकित दिग्दर्शक
Marathi Actor:बॉलिवूडमधील काही गाजलेल्या सिनेमांच्या यादीत येणारं मुख्य नाव म्हणजे 'राजा और रंक'. १९६८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची आजही चर्चा होताना दिसते. त्याकाळी या चित्रपटापेक्षा त्यातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. या चित्रपटात संजीव कुमार आणि अभिनेत्री कुमकुम, निरुपा रॉय, नझिमा, बिपीन गुप्ता यांची मुख्य भूमिका होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है... या हृदयस्पर्शी गाण्यानं सिनेरसिकांच्या डोळ्यांत पाणी आणलं. परंतु तुम्हाला माहितीये का. या चित्रपटात एक मराठमोळा चेहरा झळकला आहे,असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही.
कोटय्या प्रत्यागत्मा दिग्दर्शित 'राजा और रंक' चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत अभिनेते महेश कोठारे झळकले होते. या चित्रपटात त्यांनी युवराज नरेंद्रदेव ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. महेश कोठारे यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं होतं.
महेश कोठारे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत.त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मात्र, त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.'झपाटलेला', 'धूमधडाका', 'थरथराट', 'पछाडलेला' अशा सिनेमांमधून महेश कोठारेंनी वेगळ्या धाटणीचे विनोदी सिनेमे दिग्दर्शित करुन स्वतःची वेगळी छाप सोडली. महेश कोठारे हे मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते, निर्माते आणि नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.