मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 08:49 IST2025-11-10T08:43:36+5:302025-11-10T08:49:00+5:30
मराठी सिनेविश्वातून एक गुडन्यूज येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.

मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
मराठी सिनेविश्वातून एक गुडन्यूज येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अभिनेता अक्षय वाघमारेची पत्नी योगिता पुन्हा गरोदर आहे. नुकतंच योगिताचं बेबी शॉवर पार पडलं. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत अक्षयने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. अक्षय आणि योगिताच्या आयुष्यात पुन्हा एक नवा पाहुणा येणार आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण आहे.
अक्षयची पत्नी योगिताचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पुण्यात पार पडला. यावेळी योगिता आणि अक्षयने ट्विनिंग केलं होतं. योगिताने फुलांची ज्वेलरी परिधान केली होती. तर तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणातील तेज दिसत होतं. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून बेबी शॉवरचे काही फोटो शेअर केले आहेत.

अक्षयची पत्नी योगिता ही गँगस्टर अरुण गवळीची मुलगी आहे. अक्षय आणि योगिताने २०२० साली लग्न करत संसार थाटला. त्याआधी ५ वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर एका वर्षाने त्यांना मुलगी झाली. अक्षय आणि योगिताने आपल्या लेकीचं नाव अर्ना असं ठेवलं आहे. आता पुन्हा ते आईबाबा होणार आहेत.
अक्षय वाघमारे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अनेका मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. 'ती फुलराणी', 'ज्ञानेश्वर माऊली', 'प्रतिशोध : झुंज अस्तित्वाची' या मालिकांमध्ये तो दिसला होता. तर 'बसस्टॉप', 'बेधडक', 'युथ', 'दोस्तीगिरी', 'द स्ट्रग्सल्स' अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड', 'फत्तेशिकस्त', 'शेर शिवराज' या सिनेमांत त्याने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. अक्षयची पत्नी योगितादेखील एक निर्माती आहे. तिने निर्मिती केलेल्या 'खुर्ची' सिनेमात अक्षय मुख्य भूमिकेत होता.