"कन्नी पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणालं तू हॉलिवूडमध्ये...", अजिंक्य राऊतने शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 04:11 PM2024-03-09T16:11:27+5:302024-03-09T16:11:55+5:30

अजिंक्य 'कन्नी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेचा अनुभव त्याने शेअर केला आहे.

marathi actor ajinkya raut shared experience of kanni movie said somebody said you can work in hollywood | "कन्नी पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणालं तू हॉलिवूडमध्ये...", अजिंक्य राऊतने शेअर केला अनुभव

"कन्नी पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणालं तू हॉलिवूडमध्ये...", अजिंक्य राऊतने शेअर केला अनुभव

'मन उडू उडू झालं', 'विठु माऊली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. मालिकांमध्ये काम करून अजिंक्यने स्वत:ची ओळख निर्माण केली. अजिंक्यचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. अजिंक्य 'कन्नी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात तो मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेचा अनुभव त्याने शेअर केला आहे. 

अजिंक्य सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतात. नवीन प्रोजेक्टबरोबरच तो वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही तो चाहत्यांना देत असतो. 'कन्नी' सिनेमाबाबत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.  अजिंक्यने त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तो म्हणतो, "आता तू हॉलिवूडमध्ये काम करू शकतोस अजिंक्य दादा, कन्नी पाहिल्यानंतर असं कोणीतरी मला म्हणालं.  yeah...हाहाहा मी खूप हसलो...जोक बाजूला राहू दे...पण, मला आव्हानं आणि आव्हानात्मक भूमिका आवडतात. कन्नी सिनेमासाठी प्रत्येक कलाकार आणि टेक्निशियनने खूप मेहनत घेतली आहे. कन्नी मधील निहाल साकारणं हा अद्भुत अनुभव होता. अशाच आव्हानात्मक भूमिका मला मिळत राहो हीच प्रार्थना. माझ्या शिरपेचातील निहाल हा एक तुरा आहे. ज्याचा मला अभिमान आहे." 

'कन्नी' या सिनेमात अजिंक्य राऊतबरोबर हृता दुर्गुळे, शुभांकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ८ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून याचं दिग्दर्शन समीर जोशी यांनी केलं आहे. 

Web Title: marathi actor ajinkya raut shared experience of kanni movie said somebody said you can work in hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.