"तुमच्याकडे सगळं आहे, सातत्य ठेवा..."; मराठी अभिनेत्याचा तरुणांना मोलाचा सल्ला, हृतिक रोशनचं उदाहरण देत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:49 IST2025-03-20T13:46:20+5:302025-03-20T13:49:10+5:30
अजय पूरकर हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत.

"तुमच्याकडे सगळं आहे, सातत्य ठेवा..."; मराठी अभिनेत्याचा तरुणांना मोलाचा सल्ला, हृतिक रोशनचं उदाहरण देत म्हणाले...
Ajay Purkar: अजय पूरकर (Ajay Purkar) हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी विविध मराठी मालिका, नाटके आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शिवाय 'सुभेदार', 'पावनखिंड','शिवरायांचा छावा', 'फत्तेशिकस्त', 'फर्जंद', या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सध्याच्या वस्तुस्थितीवर भाष्य करत तरुण पीढीला मोलाचा सल्ला दिला आहे.
नुकतीच अजय पूरकर यांनी 'आरपार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "हृतिक रोशन हा डायरेक्शन डिपार्टमेंटचा चौथ्या नंबरचा असिस्टंट होता. तेव्हा तो हृतिक रोशन झाला. हा त्याचा प्रवास आहे. पण, तुम्हाला डायरेक्ट 'वॉर' चित्रपटातील हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दिसतो. पण, त्यांनी आधी इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय मेहनत घेतली आहे? हे पाहा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे आपल्याकडे शिकवलं गेलं पाहिजे. तुमच्याकडे सगळं आहे फक्त सातत्य ठेवा. तुम्ही असं सातत्याने नाही केलंत ना तर काहीच होणार नाही. अनेक वर्ष लोकांनी कठोर मेहनत घेतली आहे. पण आपल्याला ते दिसत नाही."
पुढे अनेक उदाहरणं देत अभिनेते म्हणाले, "आपल्याला एक त्यांचा वकील दिसतो, की हा कसला एसी कॅबिनमध्ये बसतो. अरे, त्याच्यासाठी त्याने कष्ट केले आहेत." असा मोलाचा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे.