Aishwarya Narkar : पन्नाशी ओलांडलेल्या ऐश्वर्या नारकर 'पतली कमरिया मोरी...'वर थिरकतात तेव्हा..., पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 18:11 IST2023-01-13T18:09:53+5:302023-01-13T18:11:43+5:30
Aishwarya Narkar : मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ऐश्वर्यांनी वयाची पन्नाशी कधीच ओलांडलीये, पण सौंदर्य असे की, आजही चाहते त्यांच्या सौंदर्यावर फिदा आहेत. तूर्तास ऐश्वर्या यांच्या एका व्हिडीओची चर्चा आहे.

Aishwarya Narkar : पन्नाशी ओलांडलेल्या ऐश्वर्या नारकर 'पतली कमरिया मोरी...'वर थिरकतात तेव्हा..., पाहा VIDEO
सदाबहार अभिनेत्री म्हटलं की, बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा चेहरा डोळ्यांपुढे येतो आणि मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री आठवायचं म्हटलं की, एकाच अभिनेत्रीची आठवण होते. ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar). मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ऐश्वर्यांनी वयाची पन्नाशी कधीच ओलांडलीये, पण सौंदर्य असे की, आजही चाहते त्यांच्या सौंदर्यावर फिदा आहेत. तूर्तास ऐश्वर्या यांच्या एका व्हिडीओची चर्चा आहे. होय, ऐश्वर्या यांचं एक रिल तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत ऐश्वर्या पतली कमरिया मोरी, तिर्ची नजरिया मोरी... या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अन्य काही कलाकारही त्यांच्यासोबत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. अरे तुम्ही सगळेजण एवढी मज्जा करता आणि आम्ही serial पाहताना किती टेन्शन घेत असतो..कैसा धक धक होता है! पता है? अशी कमेंट एका युजरने केली आहे. सगळ्यात भारी शेखर साहेब नाचताहेत, असं एकाने लिहिलं आहे. लईच कमाल, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
ऐश्वर्या या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आलेल्या ऐश्वर्या यांनी मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.चाहत्यांच्या कायम संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. रोज नवे व्हिडीओ, फोटो त्या शेअर करतात. ऐश्वर्या यांनी अपराध, धड़क, अंकगणित अशा अनेक या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रीमंता घरची सून, दुहेरी, रेशीमगाठी, सोनपावले, या सुखांनो या, स्वामिनी, ये प्यार ना होगा कम, घर की लक्ष्मी बेटीयाँ अशा असंख्य मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.