मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या लग्नाला ४ महिने पूर्ण, सोशल मीडियावर व्यक्त केले प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 11:39 IST2021-05-19T11:39:08+5:302021-05-19T11:39:47+5:30
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्या लग्नाला नुकतेच ४ महिने पूर्ण झाली आहेत.

मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या लग्नाला ४ महिने पूर्ण, सोशल मीडियावर व्यक्त केले प्रेम
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्या लग्नाला नुकतेच ४ महिने पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मानसी नाईकने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर करून प्रदीप खरेरावरील प्रेम व्यक्त करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मानसी नाईकने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर लग्नातील फोटो शेअर करून लिहिले की, चार महिने. ज्या दिवशी आपण भेटलो तो माझ्या आयुष्यातील दुसरा चांगला दिवस आहे. तर लग्न केले तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे. हॅप्पी अॅनिव्हर्सरी डार्लिंग. आय लव्ह यू सो मच.
मानसी नाईकच्या पोस्टवर प्रदीप खरेराने कमेंट करत लिहिले की, हॅप्पी अॅनिव्हर्सरी मेरी जान. मला तुझी खूप आठवण येतेय. तु जेवढा विचार करते त्याहूनही जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो. मानसीच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो बऱ्याचदा शेअर करत असतात.
मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.
मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.
एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.