मंगेश देसाई झाला नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 14:08 IST2016-07-03T08:38:00+5:302016-07-03T14:08:00+5:30
भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला या चित्रपटावर अन्याय होत असल्याने अभिनेता मंगेश देसाई नाराज झाला आहे. ...
.jpg)
मंगेश देसाई झाला नाराज
गवान दादा यांच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला या चित्रपटावर अन्याय होत असल्याने अभिनेता मंगेश देसाई नाराज झाला आहे. कारण सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने उलटले तरी अजून ही हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षक खेचत आहे. त्यामुळे नुकताच प्रदर्शित झालेला एक अलबेला हा चित्रपट मुंबईतल्या थिएटरमधून काढण्यात आला आहे. सैराट चित्रपटामुळे एक अलबेला काढण्यात आल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. एक अलबेला चित्रपटावर अन्याय होत असल्याने अभिनेता मंगेश देसाईनं नाराज झाला असल्याचे कळते. या चित्रपटात मंगेश देसाई हा प्रमुख भूमिकेत आहे. तर विद्या बालननं या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये पदार्पण केलं आहे.