व्हायरल झालेल्या 'त्या' घटस्फोट सोहळ्यातील फोटोंचं रहस्य अखेरं सर्वांसमोर आलंच, जाणून घ्या भानगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 15:41 IST2021-02-23T15:21:14+5:302021-02-23T15:41:02+5:30
घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

व्हायरल झालेल्या 'त्या' घटस्फोट सोहळ्यातील फोटोंचं रहस्य अखेरं सर्वांसमोर आलंच, जाणून घ्या भानगड
घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने साऱ्यांनाच चिंतेत पाडले आहे. असा हा घटस्फोट सोहळा साऱ्यांनाच अचंबित करून सोडणारा आहे. चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून 'मंगलाष्टक रिटर्न' या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माता वीरकुमार शहा यांनी सांभाळली आहे. त्यांच्या 'शारदा प्रॉडक्शन' या प्रॉडक्शन हाऊसतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक,आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार,भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.
लॉकडाउन नंतर चित्रपट सृष्टीला मिळालेल्या ग्रीन सिग्नल दरम्यान या 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला होता. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट असून एका नव्या कोऱ्या विषयाचा आणि कोड्यात टाकणारा दमदार विषय घेऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच घटस्फोट सोहळा असे नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे.
'बाजार' या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक योगेश भोसले प्रेक्षकांच्या समोर आला. 'बाजार' या त्यांनी केलेल्या दिग्दर्शित चित्रपटाला 16 अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांचा 'मंगलाष्टक रिटर्न' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे.