चित्रपटाच्या लेखकांच्या हक्कासाठी मानाचि संस्थेचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 18:00 IST2016-12-24T18:00:56+5:302016-12-24T18:00:56+5:30

मराठी चित्रपटसृष्ट्रीत चित्रपटासाठी मिळणारे अनुदान हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. चित्रपटाच्या अनुदानासाठी चित्रपटसृष्ट्रीतील लोक नेहमीच प्ऱयत्नशील असतात. मात्र प्रत्येक ...

Mancha institution initiative for the rights of the film's authors | चित्रपटाच्या लेखकांच्या हक्कासाठी मानाचि संस्थेचा पुढाकार

चित्रपटाच्या लेखकांच्या हक्कासाठी मानाचि संस्थेचा पुढाकार

ाठी चित्रपटसृष्ट्रीत चित्रपटासाठी मिळणारे अनुदान हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. चित्रपटाच्या अनुदानासाठी चित्रपटसृष्ट्रीतील लोक नेहमीच प्ऱयत्नशील असतात. मात्र प्रत्येक चित्रपटाला योग्य अनुदान मिळावे यासाठी नुकतेच चित्रपटसृष्ट्रीतील काही लोकांनी राज्याचे सांस्कतिक मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चित्रपटसृष्ट्रीतील समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही निर्मात्याकडून चित्रपट लेखकांची मानधन आणि श्रेयाबाबत फसवणूक होऊ नये याकरता लेखकाचे ना हरकत पत्र असल्याशिवाय मराठी चित्रपटाला अनुदान दिले जाणार नाही. याकरिता शासकीय पातळीवर नक्की कारवाई करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. मालिका, नाटक आणि चित्रपट माध्यमातील लेखकांच्या समस्या सोडविण्यासाठी मानाचि लेखक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या अध्यक्ष सचिन दरेकर, उपाध्यक्ष राजेश देशपांडे, सचिव श्रीनिवास नार्वेकर, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे, लेखक विवेक आपटे, चित्रपट समिक्षक श्रीकांत बोझेवार यांनी विनोद तावडे यांच्यासमोर चित्रपटसृष्ट्रीच्या समस्या मांडल्या आहेत. त्याचबरोबर लेखक हा चित्रपटाचा मुलभूत घटक आहे. चित्रपट लिहून पूर्ण झाल्यानंतर अनेकवेळा त्यांच्या मानधन व श्रेयाबाबत टाळाटाळ केली जाते. असदेखील यावेळी सांगण्यात आले. लेखकाच्या ना हरकत पत्राशिवाय अनुदानासाठी विचार करण्यात येऊ नये यादृष्ट्रीने केंद्रीय स्तरावर शासनाच्यावतीने शिफारस करण्याची मागणीदेखील या मानाचि या संस्थाच्या पदाधिकाºयांनी केली. यावेळी विनोद तावडे म्हणाले, नव्या होतकरू लेखकांसाठी राज्यभरात बीएमएम महाविदयालयाच्या सहकार्याने विदयापीठ स्तरीय लेखक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याचे सूचना देण्यात आले आहे. तसेच कमी आसन क्षमतेची एलईडी असलेली नाटयगृहे उभारण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Mancha institution initiative for the rights of the film's authors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.