Manasi Naik : अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर मानसी नाईकचा नवीन घरात प्रवेश, म्हणाली, 'रखरखीच्या जगण्यात...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 09:59 AM2023-04-23T09:59:43+5:302023-04-23T10:00:41+5:30

मानसीने घटस्फोटानंतर अवघ्या काही महिन्यातच नवीन घर खरेदी केलं आहे.

manasi naik marathi actress bought new house few months after her divorce shares video | Manasi Naik : अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर मानसी नाईकचा नवीन घरात प्रवेश, म्हणाली, 'रखरखीच्या जगण्यात...'

Manasi Naik : अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर मानसी नाईकचा नवीन घरात प्रवेश, म्हणाली, 'रखरखीच्या जगण्यात...'

googlenewsNext

अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी मानसीने बॉक्सर प्रदीप खरेराशी (Pradip Kharera) लग्न केलं होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला आणि सर्वांना धक्काच बसला. आता मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेली असून तिने नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे. काल अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर मानसीने नवीन घरात प्रवेश केला.

मानसीने घटस्फोटानंतर अवघ्या काही महिन्यातच नवीन घर खरेदी केलं आहे. तिने गृहप्रवेशाचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. लाल रंगाची साडी, साजेसे दागिने, नथ अशा पारंपारिक लुकमध्ये मानसीने नवीन घरात पूजा केली. यावेळी तिचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. घराच्या दरवाजावर 'श्री' असं ती लिहिते. तर कलशाची पूजाही करते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले,'प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं
या रखरखीच्या जगण्यात वावरतांना उमेद देणारं डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं माझी ऊर्जा स्थान बनले माझे नवीन घर मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर संस्कारांची शिदोरी असते एक घर.'

मानसीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मानसीच्या आयुष्यात या नवीन घराच्या रुपाने पुन्हा आनंद आला आहे. 

Web Title: manasi naik marathi actress bought new house few months after her divorce shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.