"रामदास स्वामींचा अवमान करण्याचा..." "मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमकडून स्पष्टीकरण, कोर्टाच्या निर्णयामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:53 IST2025-10-10T12:53:12+5:302025-10-10T12:53:33+5:30

''मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Manache Shlok Movie Controversy Mrunmayee Deshpande Get Relief From Mumbai High Court | "रामदास स्वामींचा अवमान करण्याचा..." "मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमकडून स्पष्टीकरण, कोर्टाच्या निर्णयामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

"रामदास स्वामींचा अवमान करण्याचा..." "मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमकडून स्पष्टीकरण, कोर्टाच्या निर्णयामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Mumbai High Court On Manache Shlok Movie: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या ''मना'चे श्लोक' या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शनाच्या अगदी आदल्या दिवशी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.  या चित्रपटाचे शीर्षकाचे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य आहे, त्याचा श्री समर्थ रामदास स्वामींशी काहीही संबंध नाही, असं निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयानं सिनेमाच्या निर्मात्यांच्या बाजूनं निकाल दिला. चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

''मना'चे श्लोक' चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहलं, "माननीय उच्च न्यायालयाने ''मना'चे श्लोक' या चित्रपटाच्या प्रदर्शन थांबवण्यासाठीच्या केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्थगिती आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. आम्ही ''मना'चे श्लोक' चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत करत आहोत. ''मना'चे श्लोक' या नावाचा चित्रपट येत असल्याचे सर्वानाच खूप आधीपासून माहीत होते. मात्र, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याचा अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला".

पुढे टीमने म्हटलं की, "प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीपासून सोशल मीडियावर नावाबाबत विरोधाचे मेसेजेस फिरू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण टीमला अनावश्यक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. घटनांचा क्रम बघता हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका येते आणि हे दुर्दैवी आहे. चित्रपटामध्ये रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या कुठल्याही श्लोकाचा उल्लेख सुद्धा नाही. ''मना'चे श्लोक' हे शीर्षक चित्रपटातील नायक व नायिका म्हणजेच मनवा आणि श्लोक यांनी त्यांच्या मनांबरोबर सुरू केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे". 

शेवटी लिहलं, "आम्ही सर्वजण रामदास स्वामींच्या सर्व रचनांचा सन्मान करतो आणि त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. आम्ही या नावाशी प्रामाणिक आहोत. आत्ता संपूर्ण मराठी सिनेसृष्टी स्वतःच्या पायांवर भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना, अशा कौटुंबिक सिनेमाचं स्वागत करण्याऐवजी कुठलीही माहिती न घेता, सर्वांना विरोध करण्यास प्रवृत्त करण्यात आले हे निराशा जनक आहे. अखेर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो की, जसे तुम्ही याआधी आम्हाला प्रेम दिले, तसेच यावेळीही चित्रपटाला भरभरून प्रेम द्यावे. आणि मनामध्ये कुठलेही किंतु परंतु न आणता या सिनेमाला आशीर्वाद आणि भरघोस प्रतिसाद द्यावा. तुमचीच, टीम", असे आवाहन प्रेक्षकांना करण्यात आलं. 


दरम्यान, मृण्मयी देशपांडे ''मना'चे श्लोक' या चित्रपटात  फक्त अभिनय करताना दिसणार नाही, तर तिने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच सिनेमाचे दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट आज  १० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब ही तरुण कलाकारांची तगडी फळी आहे. त्यांच्यासोबतच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Web Title : कोर्ट ने 'मनाचे श्लोक' फिल्म को दी हरी झंडी; टीम ने रामदास स्वामी विवाद पर स्पष्टीकरण दिया।

Web Summary : मुंबई उच्च न्यायालय ने 'मनाचे श्लोक' की रिलीज रोकने की याचिका खारिज की। टीम ने स्पष्ट किया कि शीर्षक का संबंध पात्रों से है, रामदास स्वामी से नहीं। वे स्वामी के काम का सम्मान करते हैं और उनका अपमान करने का इरादा नहीं था। फिल्म अब सिनेमाघरों में है।

Web Title : Court clears 'Manache Shlok' movie; team clarifies Ramdas Swami controversy.

Web Summary : Mumbai High Court dismissed a petition to halt 'Manache Shlok' release. The team clarified the title's connection to characters, not Ramdas Swami. They respect Swami's work and didn't aim to offend. The film is now in theaters.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.