साखर खाल्लेला माणूस हे नाटक करतयं मधुमेहाविषयी जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 12:12 IST2016-12-25T12:12:33+5:302016-12-25T12:12:33+5:30
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात जर मधुमेहसारखा गंभीर आजार असेल ...
.jpg)
साखर खाल्लेला माणूस हे नाटक करतयं मधुमेहाविषयी जनजागृती
आ च्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात जर मधुमेहसारखा गंभीर आजार असेल तर व्यक्ती हा त्याची पर्वा करत नाही. त्यासाठी या आजाराविषयी आरोग्यविषयक प्रकाशनं, शासकीय व खासगी जाहिराती, वृत्तपत्रं-नियतकालिकांमधून मोठया प्रमाणात जनजागृती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र या आजाराविषयी नाटयसृष्ट्रीनेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे. साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके अभिनेते प्रशांत दामले हे मधुमेहाविषयी जनजागृती करताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. लेखक विद्यासागर अध्यापक यांनी हे नाटक लिहिलं आहे. तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. त्याचप्रमाणे लेखक विद्यासागर अध्यापक यांनी मधुमेह केन्द्रस्थानी ठेवून रचलेलं हे नाटक चक्क विनोदी आणि ब्लॅक कॉमेडी शैलीतलं आहे. मधुमेहाबद्दल जनजागृती करण्याचा वगैरे कसला पवित्रा न घेता त्याची गंभीरता हसत-खेळत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिबवण्याचा हा प्रयत्न नाटकाद्वारे केलेला आहे. वरकरणी वास्तववादी वाटणारं हे नाटक ब्लॅक कॉमेडी अंगानं धमाल उलगडत जातं. या नाटकाच्या माध्यमातून शुभांगी गोखले यादेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. तसेच या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेते प्रशांत दामले ही जोडी पहिल्यांदाच या नाटकात एकत्र आली आहे. त्याचप्रमाणे किशोर इंगळे यांनी छायाप्रकाशाच्या खेळातून नाटकाची पिंडप्रकृती सांभाळली आहे. अशोक पत्कींचं संगीतदेखील उत्तम आहे. गुरू ठाकूर यांचं गाणं देखील नाटकाला चार चाँद लावतात. तर ऋचा आपटे आणि संकर्षण कºहाडे या दोन कलाकारांनीदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकत आहे.