​मकरंद अनासपुरे म्हणतोय, व्यसनमुुक्तीसाठी कठोर कायदे करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:21 IST2017-01-22T08:32:10+5:302017-01-22T14:21:08+5:30

अभिनेता मकरंद अनासपुरे आपल्याला चित्रपटांसोबतच आता समाजकार्य करताना देखील पाहायला मिळत अहेत. नाना पाटेकर यांच्या सोबत मकरंद नाम या ...

Makrand Anaspuri says, make strict laws for de-addiction | ​मकरंद अनासपुरे म्हणतोय, व्यसनमुुक्तीसाठी कठोर कायदे करा

​मकरंद अनासपुरे म्हणतोय, व्यसनमुुक्तीसाठी कठोर कायदे करा

िनेता मकरंद अनासपुरे आपल्याला चित्रपटांसोबतच आता समाजकार्य करताना देखील पाहायला मिळत अहेत. नाना पाटेकर यांच्या सोबत मकरंद नाम या संस्थेसाठी काम देखील करीत आहे. आता पुन्हा एकदा मकरंदने एका सामाजिक विषयावर प्रकाश टाकला आहे. नुकताच मकरंद मुक्तीपथ या अभियानाअंतर्गत एका गावामध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणुन बोलत होता. यावेळी मकरंद सांगतोय, सरकारने महसूलचा विचार न करता नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी पावले उचलावीत. समाज व्यसनमुक्त करण्यासाठी सरकारने कठोर कायदे करावे,जगात सकारात्मक व नकारात्मक व्यसन आहे. नकारात्मक व्यसनाचा त्याग करुन सकारात्मक व्यसन करायला पाहिजे. देशाचे भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे. मात्र विद्यार्थी घडविणारे शिक्षकच व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन व्यसनी शिक्षकांना धडा शिकवावा. आपल्या शाळा आणि महाविद्यालयासमोरील तंबाखू, गुटख्याचे दुकान हटविले पाहिजे. यासाठी मात्र सरकारनेही सहकार्य करण्याची गरज आहे. फक्त महसूल मिळविण्यासाठी सरकारने नागरिकांच्या जिवाशी खेळू नये. आता मकरंदने दिलेला हा मोलाचा सल्ला नक्कीच त्याचे चाहते ऐकतील यात काही शंकाच नाही.       

Web Title: Makrand Anaspuri says, make strict laws for de-addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.