मकरंद अनासपुरे का वेळ आली सरकारी कर्मचारी बनण्याची ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 11:28 IST2016-11-22T10:46:24+5:302016-11-22T11:28:50+5:30
अभिनेता मकरंद अनासपुरे याने अभिनय सोडला का असा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडला असेल? तर गोंधळून जाऊ नका. कारण मकरंद ...
.jpg)
मकरंद अनासपुरे का वेळ आली सरकारी कर्मचारी बनण्याची ?
अ िनेता मकरंद अनासपुरे याने अभिनय सोडला का असा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडला असेल? तर गोंधळून जाऊ नका. कारण मकरंद याने अभिनय सोडला नाही तर तो त्याच्या आगामी चित्रपटात सरकार कर्मचाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या कलाकाराने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटदेखील केले आहेत. आता, त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव नागपूर अधिवेशन एक सहल .. असे आहे. या चित्रपटात मकरंद यांनी नागपूर अधिवेशन चित्रपटात शासकीय यंत्रणेच्या दबावाखाली असलेल्या सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्याची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. त्याच्या या पात्राचे नाव संजय साळुंखे आहे. नागपूरमध्ये दरवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर पहिल्यांदाच या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. थोडक्यात, हिवाळी अधिवेशनाच्या काळात या कर्मचाऱ्याला वरिष्ठांच्या अनेक जबाबदाऱ्या संभाळाव्या लागतात. कामाची जबाबदारी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळताना त्याच्या तारेवरची कसरत कशी होते हे गंमतीशीर पद्धतीने या सिनेमात दाखवण्यात आले आहे. निलेश जळमकर लिखित आणि दिग्दर्शित हा एक पॉलिटीकल सटायर चित्रपट असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अनेक गंमतीजमती या निमित्ताने रूपेरी पडद्यावर उलगडणार आहेत. तसेच या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी, भारत गणेशपुरे, चेतन दळवी, अमोल ताले, संकर्षण कºहाडे, विनीत भोंडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण या कलाकारांचा समावेश आहे. यापूर्वी मकरंदने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. त्याचप्रमाणे त्याचे सामाजिक कार्य हे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्याच्या सामाजिक कार्यप्रमाणेच तो सरकारी कर्मचाºयाची भूमिका कशापध्दतीने बजावतो हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ९ डिसेंबरपर्यत वाट पाहावी लागणार आहे.