मकरंद देशपांडेची पत्नी आहे आदिती पोहनकरची बहीण, तिच्या इतकीच आहे ती सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 19:46 IST2019-12-24T19:32:21+5:302019-12-24T19:46:04+5:30
आदिती इतकीच तिची बहीण देखील सुंदर असून ती प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडेची पत्नी आहे.

मकरंद देशपांडेची पत्नी आहे आदिती पोहनकरची बहीण, तिच्या इतकीच आहे ती सुंदर
लय भारी या चित्रपटामुळे आदिती पोहनकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिची भूमिका तर प्रेक्षकांना आवडली. पण त्याचसोबत तिच्या सौंदर्याची देखील चांगलीच चर्चा झाली. तुम्हाला माहीत आहे का, आदिती इतकीच तिची बहीण देखील सुंदर असून ती प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडेची पत्नी आहे.
आपल्या अभिनयाने मराठी सिनेमासह रंगभूमी, हिंदी सिनेमांमध्ये छाप पाडणारे अभिनेते म्हणजे मकरंद देशपांडे. मात्र मकरंद देशपांडे यांचे खासगी आयुष्यसुद्धा तितकंच चर्चेत राहिलं आहे. शशी कपूर यांची कन्या संजना कपूर यांच्यासह मकरंद यांच्या अफेअर आणि रिलेशनशिपच्या चर्चा काही वर्षांपूर्वी रंगल्या होत्या. त्यावर त्यांनी मौन राखणेच पसंत केले होते. त्यानंतर निवेदिता पोहनकर त्यांच्या आयुष्यात आली. ती त्यांच्यापेक्षा वयाने २० वर्षांनी लहान असून त्यांनी काही वर्षांच्या नात्यानंतर गेल्या वर्षी लग्न केले.
निवेदिता लेखिका असून पृथ्वी थिएटरशी जोडली गेलेली आहे. रंगभूमीवर वावरतानाच या दोघात प्रेमाचे नातं फुललं असल्याचं म्हटलं जातं. निवेदिता मराठी अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहिण आहे. तिची आई शोभा पोहनकर नॅशनल लेव्हल हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पियन आहेत.याशिवाय तिचे काका अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत.