माझी तुझी रेशमगाठमधील यश अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत खेळणार 'आपडी-थापडी'चा खेळ,

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 01:59 PM2022-09-08T13:59:50+5:302022-09-08T14:22:51+5:30

श्रेयस तळपदेची लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि चित्रपटांतून कारकिर्द सुरू केली. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं.

Majhi Tuzi Reshimgath's fame Shreyas Talpade will share screen with Mukta Barve | माझी तुझी रेशमगाठमधील यश अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत खेळणार 'आपडी-थापडी'चा खेळ,

माझी तुझी रेशमगाठमधील यश अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत खेळणार 'आपडी-थापडी'चा खेळ,

googlenewsNext

मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत 'आपडी थापडी' या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. 

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या "आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.चित्रपटाचं छायांकन सुमन साहू यांचे  आहे. चित्रपटाचं पोस्टर फील गुड असल्याने "फॅमिली चा चित्रपट बघा फॅमिली बरोबर" अशी टॅग लाईन असल्याने हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि सहकुटुंब पाहता येईल यात शंका नाही . 

श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि चित्रपटांतून कारकिर्द सुरू केली. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं. "बाजी" आणि "पोस्टर बॉईज"या चित्रपटांनंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार आहे.  त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी सशक्त अभिनेत्री असल्यानं आपडी-थापडी नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना दसऱ्याची प्रतीक्षा आहे. 

Web Title: Majhi Tuzi Reshimgath's fame Shreyas Talpade will share screen with Mukta Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.