"माझी तेजू.. माझी सखी... माझी...", नम्रता संभेरावची तेजस्विनी पंडितच्या वाढदिवशी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:57 PM2024-05-23T13:57:57+5:302024-05-23T13:58:53+5:30

नम्रता संभेराव (Namrata Sambherao)ने इंडस्ट्रीतील तिची मैत्रिण तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit)च्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

"Majhi Teju.. Majhi Sakhi... Majhi...", Namrata Sambherao's special post on the birthday of Tejaswini Pandit | "माझी तेजू.. माझी सखी... माझी...", नम्रता संभेरावची तेजस्विनी पंडितच्या वाढदिवशी खास पोस्ट

"माझी तेजू.. माझी सखी... माझी...", नम्रता संभेरावची तेजस्विनी पंडितच्या वाढदिवशी खास पोस्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून अभिनेत्री नम्रता आवटे-संभेराव (Namrata Sambherao) घराघरात पोहचली आहे. नम्रता सध्या खूपच चर्चेत आली आहे. तिचा नाच गं घुमा (Nach Ga Ghuma Movie) हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यात नम्रताने आशाताई या कामवाल्या बाईची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक होत आहे. दरम्यान आता नम्रताने इंडस्ट्रीतील तिची मैत्रिण तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit)च्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आज म्हणजेच २३ मे रोजी ३८वा वाढदिवस साजरा करते आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने तेजस्विनीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तेजस्विनीचा शूट दरम्यान हसतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझी तेजू माझी सखी माझी बहीण मैत्रीण. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुझ्या सोबत मॅडनेस करायला एक वेगळीच मज्जा येते. लव्ह यू. आयुष्यभर अशीच हसत रहा आणि माझ्यासोबत रहा.


नम्रता संभेरावच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते तेजस्विनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. नम्रता आणि तेजस्विनीने एकदा येऊन तर बघा या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा एक विनोदी सिनेमा असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन प्रसाद खांडेकरने केला आहे. यात नम्रता आणि तेजस्विनी बहिणींच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, भाऊ कदम, सुभेदार विशाखा, सयाजी शिंदे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: "Majhi Teju.. Majhi Sakhi... Majhi...", Namrata Sambherao's special post on the birthday of Tejaswini Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.