परश्या झळकणार महेश मांजरेकराच्या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 10:28 IST2016-06-07T04:58:01+5:302016-06-07T10:28:01+5:30
सैराट या चित्रपटाची झिंगाट अजून ही संपूर्ण महाराष्ट्राला चढलेली दिसत आहे. ही झिंग उतरना उतरत त्यात या चित्रपटाचा हॅण्डसम ...

परश्या झळकणार महेश मांजरेकराच्या चित्रपटात
स राट या चित्रपटाची झिंगाट अजून ही संपूर्ण महाराष्ट्राला चढलेली दिसत आहे. ही झिंग उतरना उतरत त्यात या चित्रपटाचा हॅण्डसम बॉय परश्या म्हणजेच आकाश ठोसर हा चित्रपटात झळकणार आहे. ते पण मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे. खरं तर ही परश्याची लॉटरीच लागली असे म्हणायला हरकत नाही. कारण महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार उत्साही असतो. त्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नंतर महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करायला मिळणे म्हणजे करिअरला चार चाँद लागल्यासारखेच आहे. परश्या हा 'एफयु' या चित्रपटात प्रमुख भुमिकेत असणार आहे. हा चित्रपट चार मित्रांच्या कहानीवर आधारित आहे. तसेच आजच्या तरूणांची लाइफस्टाइल व त्यांची भाषा यावर हा चित्रपट असणार आहे. परश्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट असणार आहे.
![]()