महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावेच्या 'देवमाणूस'चे नवीन पोस्टर्स भेटीला, टीझर उद्या होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:36 IST2025-02-12T13:35:33+5:302025-02-12T13:36:15+5:30

Devmanus Movie : मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'देवमाणूस'चे दमदार पोस्टर्स रिलीज केल्यानंतर उद्या या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mahesh Manjrekar, Renuka Shahane and Subodh Bhave's new posters of 'Devmanus' unveiled, teaser to be launched tomorrow | महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावेच्या 'देवमाणूस'चे नवीन पोस्टर्स भेटीला, टीझर उद्या होणार लाँच

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावेच्या 'देवमाणूस'चे नवीन पोस्टर्स भेटीला, टीझर उद्या होणार लाँच

तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'देवमाणूस'(Devmanus Movie)ची घोषणा केल्यापासून प्रेक्षक अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), रेणुका शहाणे (Renuka Shahane), सुबोध भावे (Subodh Bhave) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) अशा या दिग्गज आणि पॉवरहाऊस कलाकारांचे वैशिष्ट्य असलेले पोस्टर्स पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. उद्या या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे.

रिलीझ झालेल्या देवमाणूस चित्रपटातील पोस्टर्समध्ये मुख्य पात्रांचे अतिशय मोहक लूक पाहायला मिळतो आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांचा खूपच साधा पण इंटेन्स लुक आपल्याला दिसून येतो, त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते. अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लुक लक्ष वेधून घेणारा आहे तर सुबोध भावेला पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहू शकतो .तसेच अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं रहस्य वाढवतो. अशा या अनोख्या पोस्टर्समुळे उद्या टीझरमध्ये नक्की काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांना आहे.


लव फिल्म्स प्रस्तुत, देवमाणूस या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

 

Web Title: Mahesh Manjrekar, Renuka Shahane and Subodh Bhave's new posters of 'Devmanus' unveiled, teaser to be launched tomorrow