महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार, पत्नी मेधा यांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 21:04 IST2025-08-05T21:03:08+5:302025-08-05T21:04:20+5:30
महेश मांजरेकर यांना ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले

महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार, पत्नी मेधा यांना अश्रू अनावर
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. यावेळी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महेश मांजरेकर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार स्वीकारत होते तेव्हा त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना अश्रू अनावर झाले. यावेळी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना महेश मांजरेकर म्हणाले की, "ही बाहुली खूप प्रिय आहे मला. याचा मला सार्थ अभिमान आहे. आज या बाहुलीचं महत्व फार मोठं आहे. एका गोष्टीचा आनंद आहे मराठी चित्रपटसृष्टी योग्य हातात आहे. मराठी सिनेमा पुन्हा दैदिप्यमान पदावर असेल, याची खात्री देतो."
"सिनेमा वाढवला, मान दिला तो व्ही. शांताराम यांनीच. वडाळ्याला बसचे पैसे वाचवायचे म्हणून चालत जायचे. प्लाझाच्या समोर एक ट्रँगल आहे . त्यावेळी मी शांताराम बापूंना मी प्लाझाकडे बघताना पाहिलं होतं. तिथून ते आजपर्यंतचा प्रवास मी नक्कीच काहीतरी चांगलं केलं असेन. व्ही. शांताराम अफाट दिग्दर्शक होते. त्यांनी तसे . १० वर्ष तरी मला या व्यासपीठावर चांगले सिनेमे घेऊन यायचंय हल्ली मी काही सिनेमे पाहिले त्यामुळे स्पर्धेत उतरणं गरजेचं आहे. कंटेंटनुसार आपण पुढे आहोत पण आता व्यवहारानुसारही पुढे जाणं आवश्यक आहे."