Panghrun Movie Trailer : महेश मांजरेकरची मुलगी गौरी इंगवलेच्या पांघरूण या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 15:38 IST2020-02-18T15:36:33+5:302020-02-18T15:38:07+5:30
Panghrun Movie Teaser : गौरीला महेश मांजरेकर आपला आगामी सिनेमा 'पांघरुण' मधून लाँच करणार आहेत.

Panghrun Movie Trailer : महेश मांजरेकरची मुलगी गौरी इंगवलेच्या पांघरूण या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?
बॉलिवूडप्रमाणे सध्या मराठी इंडस्ट्रीत सुद्धा कलाकारांच्या मुलांचा डेब्यू सुरू आहे. मराठीतला प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सलमान खानच्या ‘दबंग 3’ मधून सई मांजरेकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सईनंतर गौरी इंगवलेसुद्धा आपलं पदार्पण करण्यास तयार आहे. मराठी सिनेसृष्टीचा लोकप्रिय चेहरा म्हणून महेश मांजरेकरकडे पाहिलं जातं. मांजरेकरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
गौरीला महेश मांजरेकर आपला आगामी सिनेमा 'पांघरुण' मधून लाँच करणार आहेत. गौरी 'पांघरुण' मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. सिनेमाची कथा एक विधवा महिल्याच्या आयुष्याभवती फिरणारी आहे. बालकलाकार म्हणून गौरीने मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र खऱ्या अर्थाने गौरीच्या करिअरला सुरुवात आता होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये गौरी नृत्य करताना आपल्याला दिसत असून तिचे लग्न देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीजची आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मामी चित्रपट महोत्सवात पांघरुणचे स्क्रिनिंग पार पडले होते. यावेळी या चित्रपटाचा हाऊसफुल शो पार पडला होता. हा चित्रपट आता 3 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.