आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारा महेश काळे हा आता संगीतकार बनला आहे. महेशने नकुशी या मालिकेसाठी संगीत दिग्दर्शन ...
महेश काळे बनला संगीतकार
n style="line-height: 20px;">आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारा महेश काळे हा आता संगीतकार बनला आहे. महेशने नकुशी या मालिकेसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. 'नकुशी.. तरीही हवीहवीशी'या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. या मालिकेद्वारे त्याचा संगीतकार म्हणून 'स्टार प्रवाह'बरोबर नवा प्रवास सुरू होत आहे. ही अतिशय वेगळ्या विषयावरची मालिका असून ती नक्कीच लक्ष वेधून घेणार आहे. एक वेगळा प्रयोग करत असल्याचं महेशनं सोशल मीडियावरदेखील जाहीर केलं आहे. त्यामुळे महेशच्या चाहत्यांमध्ये या गाण्याविषयी मोठी उत्सुकता होती. मालिकेच्या टायटल साँगचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आल्यावर त्याच्या या नव्या प्रयत्नाचं सोशल मीडियातून भरभरून स्वागत झालं आहे. गीतकार समीर सामंतनं नकुशीचं टायटल साँग लिहिलं आहे. तर, बेला शेंडेनं गाणं गायलं आहे.