मयुरी वाघच्या लग्नाची वरात निघणार बडोदयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:20 IST2017-01-22T08:20:47+5:302017-01-22T14:20:54+5:30
अभिनेत्री मयुरी वाघ लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे आता सर्वांनाच माहित झाले आहे. मयुरी सध्या तिच्या लग्नाच्या तयारीला लागल्याचे समजतेय. ...
(9).jpg)
मयुरी वाघच्या लग्नाची वरात निघणार बडोदयात
अ िनेत्री मयुरी वाघ लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे आता सर्वांनाच माहित झाले आहे. मयुरी सध्या तिच्या लग्नाच्या तयारीला लागल्याचे समजतेय. अहो एवढेच नाही तर मयुरपीचे लग्न बडोदयात होणार आहे. बडोदयातील अगदी पारंपारिक पारंपारीक रितीरिवाजाने मयुरी पियुष रानडे सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या वेळी ही मराठमोळी नवरी शालु नेसणार नाही तर तिच्यासाठी खास पांढºया रंगाची आणि लाल काठ असलेली साडी डिझाईन करण्यात आली आहे. त्यामुळे मयुरी आणि पियुषचा लग्नसोहळा जरा हटकेच असल्याचे समजतेय. नुकताच या दोघांचा साखरपुडा झाला होता. आता या नवीन वर्षात म्हणजेच फेबु्रवारी महिन्यात हे दोघेही विवाहबदध होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत सनईचौघडे वाजणार एवढे मात्र नक्की. आता या वर्षाची सुरुवात तर मयुरी आणि पियुषच्या लग्नाने झाली आहे. पाहुयात मग यंदाच्या वर्षी मराठी इंडस्ट्रीतील अजुन किती जोडया विवाहबंधनात अडकणार आहेत.