आवडता अभिनेता आमिर खान असला तरीही माधवी निमकरला या अभिनेत्या बरोबर जायचंय डेटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 19:04 IST2020-04-23T18:59:41+5:302020-04-23T19:04:18+5:30
छोट्या पडद्यावर 'हम तो तेरे आशिक है' या मालिकेत ती झळकली होती.

आवडता अभिनेता आमिर खान असला तरीही माधवी निमकरला या अभिनेत्या बरोबर जायचंय डेटवर
माधवी निमकर रील लाईफप्रमाणेच ग्लॅमरस आहे. जेव्हा माधवी निमकरला काही झटपट प्रश्न विचारण्यात आले. तिचा आवडता अभिनेता कोण, आवडता सिनेमा, अभिनेत्री, कोणसोबत डेटवर जायला आवडेल असे काहीसे प्रश्न विचारण्यात आले. कोणासोबत डेटवर जायला आवडेल असे तिला विचारले असता तिने क्षणाचाही विलंब न करता सलमान खान असे उत्तर दिले. तिला सलमानसोबक एकदातरी डेटवर जायला आवडेल.
छोट्या पडद्यावर 'हम तो तेरे आशिक है' या मालिकेत ती झळकली होती. त्यावेळी तिला रसिक असेच काही भन्नाट प्रश्न विचारायचे. त्यावेळचा हा किस्सा आहे. प्रत्येक कलाकाराचा आवडता अभिनेता, अभिनेत्री असते. प्रत्येकाची आपली एक आवड असते. बऱ्याचदा कलाकार यावर आपली मनमोकळी भावना व्यक्त करतात. माधवी निमकरबाबतही नेमकं तेच घडले. दबंग सलमान खानचे कोट्यवधी फॅन्स आहेत. मोस्ट इलिजिबेल बॅचलर असणाऱ्या सलमानसाठी लग्न करण्यासाठी अनेक तरुणी उत्सुक आहेत.
अनेकांच्या गळ्यातील ताईत असणारा सलमान खान माधवी निमकरचाही आवडता कलाकार आहे. स्वतः माधवीने याची कबूली दिली होती. रिअल लाइफमध्ये सलमानची आशिक है… सलमानवेडी असणाऱ्या माधवीला फिटनेसचेही वेड आहे. मालिकेत झुंबा डान्स घेणारी शालू खऱ्या आयुष्यात देखील तितकीच फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते. माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.