हृता दुर्गुळेच्या करिअरमध्ये मधुराणी प्रभुलकरचाही वाटा, नक्की काय आहे कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:57 IST2025-09-11T16:56:59+5:302025-09-11T16:57:28+5:30

'फुलपाखरु' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं काय आहे कनेक्शन

Madhurani Prabhukar also played a role in Hruta Durgule s career she was her mentor | हृता दुर्गुळेच्या करिअरमध्ये मधुराणी प्रभुलकरचाही वाटा, नक्की काय आहे कनेक्शन?

हृता दुर्गुळेच्या करिअरमध्ये मधुराणी प्रभुलकरचाही वाटा, नक्की काय आहे कनेक्शन?

'फुलपाखरु' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule). या मालिकेमुळे एक सुंदर, गोड अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीला मिळाली. तिची 'मन उडू उडू झालं' ही मालिकाही गाजली. हृताने नंतर नाटक, सिनेमांमध्ये काम केलं. आता तिचा 'आरपार' सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच ललित प्रभाकरसोबत दिसली आहे. दोघांच्या केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. दरम्यान हृताच्या या यशामध्ये 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचाही (Madhurani Prabhulkar) वाटा आहे. तो कसा काय वाचा.

मधुराणी प्रभुलकरची उत्तम अभिनेत्री, कवयित्री अशी ओळख आहे. मात्र ती एक प्रशिक्षिकाही आहे. तिने अनेकांचं करिअर घडवलं आहे हे तुम्हाला माहितीये का? मधुराणी आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांची मिरॅकल्स अ‍ॅक्टींग ही अ‍ॅकॅडमी चालवतात. त्यांच्या या अ‍ॅकॅडमीमध्ये आतापर्यंत अनेक नवोदित कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ह्रता दुर्गुळे आणि शिवानी बावकर हे त्यांचे विद्यार्थी आहेत.  याच संस्थेत त्यानी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. मधुराणीच्या संस्थेमधून आतापर्यंत  गिरिजा प्रभू, किरण गायकवाड, निखिल चव्हाण या कलाकारांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. 

हृता दुर्गुळेने मराठी तसंच हिंदीतही अभिनय केला आहे. गुरमीत चौधरीसोबत तिची 'कमांडर करण सक्सेना' ही सीरिज आली होती. तसंच मराठीत हृताने 'कन्नी','टाईमपास ३', 'अनन्या','सर्किट' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. जवळपास १० वर्ष हृता टेलिव्हिजनवर दिसली. 'फुलपाखरु','मन उडू उडू झालं','दुर्वा' या तिच्या मालिका आहेत. 

Web Title: Madhurani Prabhukar also played a role in Hruta Durgule s career she was her mentor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.