मधु इथे अन चंद्र तिथे टीमची खवय्येगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 13:00 IST2016-05-30T07:30:03+5:302016-05-30T13:00:03+5:30
खवय्येगिरी चा बेत आखत मधु इथे अन चंद्र तिथे या आगामी मराठी चित्रपटाची टीम झी मराठीच्या ...

मधु इथे अन चंद्र तिथे टीमची खवय्येगिरी
‘चित्रपंढरी’ या बॅनरखाली येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते झी टॉकीज व रत्नकांत जगताप आहेत. दिग्दर्शक संजय झणकर मधु इथे अन चंद्र तिथे या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर उलगडणार आहेत. प्रत्येक शहराची स्वत:ची एक खासियत असते. हीच खासियत घेऊन कोल्हापूर व पुणे हे एकत्र आल्यावर उडणाऱ्या धमाल कथेची मेजवानी म्हणजे मधु इथे अन चंद्र तिथे हा सिनेमा. धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट घडवत प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी हा सिनेमा देणार आहे. आनंद इंगळे, भाऊ कदम, किशोर चौघुले, शैला काणेकर विशाखा सुभेदार, संजय मोहिते, ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर अशी विनोदवीरांची फौज यात आहे. १२ जूनला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे.