'मेड फॉर इच अदर' कपल पियुष रानडे आणि मयुरी वाघने सेलिब्रेट केली 1st Wedding Anniversary,बघा लग्नाचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:49 IST2018-02-01T09:19:22+5:302018-02-01T14:49:22+5:30

सिनेमा,नाटक आणि मालिकांमध्ये काम करता करता कलाकारांची ओळख होऊन ते आयुष्याचे जोडीदार बनल्याची अनेक उदाहरणं आहेत.यांत मयूरी आणि पियूषची ...

'Made for It Other' Kapil Piyush Ranade and Mayur Wagh celebrate 1st wedding Anniversary, watch the wedding album | 'मेड फॉर इच अदर' कपल पियुष रानडे आणि मयुरी वाघने सेलिब्रेट केली 1st Wedding Anniversary,बघा लग्नाचा अल्बम

'मेड फॉर इच अदर' कपल पियुष रानडे आणि मयुरी वाघने सेलिब्रेट केली 1st Wedding Anniversary,बघा लग्नाचा अल्बम

नेमा,नाटक आणि मालिकांमध्ये काम करता करता कलाकारांची ओळख होऊन ते आयुष्याचे जोडीदार बनल्याची अनेक उदाहरणं आहेत.यांत मयूरी आणि पियूषची भर पडली आहे.अस्मिता या मालिकेत काम करता करता मयूरी आणि पियूषची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत झालं. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.1 फेब्रुवारी 2016 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले होते.त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.बडोद्यात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी मयूरी आणि पियूषचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत हा शानदार विवाहसोहळा पार पडला.या सोहळ्यानंतर मयूरी आणि पियूषने शानदार फोटोसेशनसुद्धा केले.यावेळी या नवदाम्पत्याच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी मयुरी लग्नात अतिशय सुंदर दिसत होती.गेल्या वर्षी आपल्या नात्याला जन्मोजन्मीच्या बंधनात बदलण्याचा निर्णय या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा पार पडला होता.





Also Read:जाणून घ्या अभिनेत्री मयुरी वाघच्या फिटनेसचे काय रहस्य?

आपल्या सर्वांची लाडकी ‘अस्मिता’ म्हणजेच मयुरी वाघने सध्या स्वतःच्या फिटनेसकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यासाठी तिने एक वेगळंच वर्कआऊट प्लॅन केले आहे.‘शोधलं की सापडतं’अशा मताची असणारी अस्मिता म्हणजेच मयुरीने तिच्या फिटनेसचा  फंडा शोधून काढला आहे.मयुरीला डान्स करायला खूप आवडतं.त्यामुळे तिेने फिट राहण्यासाठी ‘झुंबा’ ही अनोखी रिदमीक वर्कआऊट ती करते. जिममध्ये तासनतास वर्कआऊट करण्यापेक्षा तिला  झुंबा करणे खूप आवडते.रोज झुंबा क्लासची वेळ कधी होईल याची आतुरतेने वाट पाहात असते.मयुरीने यावर्षी एका झुंबा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला असून तिचं हे वर्कआऊट ती खूप एन्जॉय करतेय. ही फिटने थेरपी फक्त तिच्यापुरतीच मर्यादित राहू नये त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही या रिदमिक वर्कआऊटची माहिती मिळावा यासाठी तिने तिच्या झुंबा डान्स मूव्हजचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Web Title: 'Made for It Other' Kapil Piyush Ranade and Mayur Wagh celebrate 1st wedding Anniversary, watch the wedding album

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.