मराठी चित्रपटासाठी प्रियकांचे शुट पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 14:28 IST2016-07-13T08:58:59+5:302016-07-13T14:28:59+5:30

 अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसखाली  व्हेंटिलेटर या मराठी चित्रपट येणार आहे ही गोष्ट जगजाहीरच आहे. ...

The lover's shoots for the Marathi film are complete | मराठी चित्रपटासाठी प्रियकांचे शुट पूर्ण

मराठी चित्रपटासाठी प्रियकांचे शुट पूर्ण

 
भिनेत्री प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसखाली  व्हेंटिलेटर या मराठी चित्रपट येणार आहे ही गोष्ट जगजाहीरच आहे. पण आपल्या अभिनयाने राष्ट्रीय स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यत आपला ठसा उमटविणारी अभिनेत्री हिने नुकतेच व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती महत्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.  तिची ही भूमिका या चित्रपटातील कथेला कलाटणी देणारी असणार आहे. हा चित्रपट फेरारी की सवारी' फेम  राजेश म्हापूसकर दिग्दर्शित करणार आहे. या मराठी चित्रपटात मराठीतील आघाडीचे तब्बल ३२ कलाकार असणार आहेत.प्रियांकाने या आधीही कमिने, अग्निपथ आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांत यापूर्वी मराठी व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. बाजीराव मस्तानीतील काशीबाईचे मराठीतील संवाद प्रियांकाने स्वत:च्याच आवाजात डब केले होते. प्रियांका स्वत:व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटात ती काम करणार असल्याने सिनेमाची उत्कंठा वाढली आहे.

Web Title: The lover's shoots for the Marathi film are complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.