'लव्ह लफडे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 12:41 IST2018-04-17T07:11:42+5:302018-04-17T12:41:42+5:30

कॉलेजलाईफ मधलं प्रेम निरागस असतं असं म्हटलं जातं मात्र त्यात जर एखादी अंधश्रद्धा डोकावली की त्या प्रेमाचा लफडा होतो. ...

'Love Laughda' movie trailer displayed | 'लव्ह लफडे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'लव्ह लफडे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

लेजलाईफ मधलं प्रेम निरागस असतं असं म्हटलं जातं मात्र त्यात जर एखादी अंधश्रद्धा डोकावली की त्या प्रेमाचा लफडा होतो. या स्टोरीलाईनवर ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव ही नवी फ्रेश जोडी नक्कीच प्रेक्षकांना भावेल.   

अवघ्या तरुणाईने नटलेल्या या चित्रपटात कॉलेज लाईफची धम्माल मस्ती, निरागस असलेले प्रियकर-प्रेयसी, त्यांना आपापल्या परीने सल्ले देणारे पुणेकर, मुंबईकर, सातारकर मित्रांची केमिस्ट्री, लव्ह आणि त्यातील लफडी, मग त्यांना भेटलेला एक लव्ह गुरु अशा या सगळ्यांची गुंफलेली कथा आपल्याला लव्ह लफडे चित्रपटात पाहण्यास मिळणार आहे. हा ट्रेलर पाहताना एकदम फ्रेश वाटते हे या ट्रेलरचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. तर कथा-पटकथा संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे चेहरे आहेत तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते, भाग्येश केम्भवी व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.

तरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसंच आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे. या गीतांना तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्ते, मंगेश बोरगावकर, मुग्धा कऱ्हाडे, रोहित राऊत, भारती मढवी या ताज्या दमाच्या गायकांनी स्वरसाज चढविलेला आहे.

प्रेमाच्या आठवणीत आपल्याला घेऊन जाणारा चित्रपट येत्या २१ जूनला मोबाईल अॅपद्वारे प्रदर्शित होत आहे. एचसीसी नेटवर्क या मोबाईल ऍपवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोबाईल अॅपवर प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Web Title: 'Love Laughda' movie trailer displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.