प्यार दोस्ती है..! म्हणत ईशा केसकरने बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 13:49 IST2021-03-03T13:48:53+5:302021-03-03T13:49:21+5:30
ईशाने ऋषी सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्यार दोस्ती है..! म्हणत ईशा केसकरने बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ईशा केसकर सध्या कोणत्या मालिकेत काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. याव्यतिरिक्त ती ऋषी सक्सेनासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. आज ऋषी सक्सेनाचा वाढदिवस असून या निमित्ताने ईशाने ऋषी सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ईशा केसकरने ऋषी सक्सेनासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, फक्तच माझा बॉयफ्रेंड नाही तर बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझा दयाळू आणि गोड माणूस आहे. गेल्या वर्षात अनेक गोष्टींचा सामना मी तुझ्यामुळे करू शकले. चिअर्स. आय लव्ह यू.
ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना बऱ्याचदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असतात. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. चाहते त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
ईशा केसकर अभिनेता ऋषी सक्सेनासोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन देखील चर्चेत असते. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत.चला हवा येऊ द्याच्या सेटवर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. दोघांमधील रोमाँटिक केमिस्ट्री त्यांच्या फॅन्स आवडते.
काहे दिया परदेस या मालिकेत ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका साकारली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. लवकरच तो रिंकु राजगुरु, प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशीसोबत 'छुमंतर' सिनेमात दिसणार आहे. ईशाबाबत बोलायचे झाले तर ती शेवटची माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दिसली होती.
ईशा केसकरला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. शेवटची ती माझ्या नवऱ्याचा बायको मालिकेत शनायाच्या भूमिकेत दिसली होती. मात्र काही कारणास्तव ही मालिका सोडली. त्यानंतर शनायाच्या भूमिकेत पुन्हा रसिका सुनील पहायला मिळाली होती.