‘आरती - अननोन लव्हस्टोरी’ सिनेमातून उलगडणार प्रेमाचे बंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 15:07 IST2017-07-12T09:37:57+5:302017-07-12T15:07:57+5:30
मराठी सिनेमे ओळखले जातात ते त्यांच्या वास्तवदर्शी कथेसाठी. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी स्वीकारल्यामुळे मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चितच मोठा झाला ...

‘आरती - अननोन लव्हस्टोरी’ सिनेमातून उलगडणार प्रेमाचे बंध
म ाठी सिनेमे ओळखले जातात ते त्यांच्या वास्तवदर्शी कथेसाठी. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी स्वीकारल्यामुळे मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चितच मोठा झाला आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या ‘आरती - अननोन लव्हस्टोरी’ या सिनेमातूनही प्रेमाच्या बंधाचे अनोखे पैलू उलगडणार आहेत. प्रेमकथेसोबत समर्पणाची एक अत्यंत ह्दयस्पर्शी अशी किनार या सिनेमाला लाभली आहे. सारा क्रिएशन आणि मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केलं आहे.नुकतेच या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले.प्रेमाच्या बदलत्या संकल्पनांना छेद देत एकमेकांसाठी आयुष्य पणास लावणारी ‘आरती - अननोन लव्हस्टोरी’ या चित्रपटाची कथा हृदय हेलावून टाकते. वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी चित्रपटाला सपोर्ट केले आहे. कलेवर भरभरून प्रेम करणाऱ्या वहिदाजींनी चित्रपटाच्या सहकार्याकरिता हात दिला असून मानवी मूल्यं जपणारी ही गोष्ट सर्वांपुढे यायला हवी असं त्यांना मनापासून वाटतं.वहिदाजींना विश्वास आहे की ‘आरती - अन्नोन लव्हस्टोरी’ हा चित्रपट नात्यांची वीण अधिक घट्ट करेल.रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून या दोघांसोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे आणि अनुष्का पाटील आदिंच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते शेफाली साथी आणि बानुमती सुजित आहेत.संवाद प्रभाकर भोसले यांचे आहेत.छायांकन व संकलन जोतीरंजन दास यांचं आहे.गीते सुजित यादव,तेजस बने यांची असून संगीत प्रशांत सातोसे आणि सुजित-तेजस यांचं आहे.गीते हरिहरन,आदर्श शिंदे,दिपाली साठे आणि सारा मेणे यांनी गायली आहेत. कलादिग्दर्शक महेश मेणे आहेत. कार्यकारी निर्माते सिद्धेश शेट्ये आहेत.