कंट्रोल न ठेवता हसायला लावणारा ‘लूज कंट्रोल’ आज प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 09:33 IST2018-02-22T04:03:23+5:302018-02-22T09:33:23+5:30

सध्या मराठीत वेगवेगळ्या दर्जेदार विषयांवर सिनेमे बघायला मिळत आहेत. पण ब-याच महिन्यांपासून एक चांगला कमर्शिअल, नुसती धमाल कॉमेडी असलेला ...

'Loose Control', which has been a no-nonsense control, is displayed today | कंट्रोल न ठेवता हसायला लावणारा ‘लूज कंट्रोल’ आज प्रदर्शित

कंट्रोल न ठेवता हसायला लावणारा ‘लूज कंट्रोल’ आज प्रदर्शित

्या मराठीत वेगवेगळ्या दर्जेदार विषयांवर सिनेमे बघायला मिळत आहेत. पण ब-याच महिन्यांपासून एक चांगला कमर्शिअल, नुसती धमाल कॉमेडी असलेला सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळाला नाही. आता हीच प्रेक्षकांची खंत ‘लूज कंट्रोल’ने दूर होणार आहे. प्रेक्षकांना लोळवून लोळवून हसवण्यासाठी, त्यांचं छप्परफाड मनोरंजन करण्यासाठी ‘लूज कंट्रोल’ची अफलातून टीम सज्ज झाली आहे. या सिनेमाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्याने सिनेमाची  आधीच उत्सुकता वाढली आहे. प्रेम झांगियानी प्रस्तुत आणि अजय सिंग दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे. 

‘लूज कंट्रोल’ची कथा भलेही तीन मित्रांची असली तरी या सिनेमातून प्रेक्षकांना सिच्युएशनल कॉमेडीचा कंट्रोल सोडून आनंद घेता येणार आहे. कारण यातील सर्वच लोकप्रिय कलाकारांनी एकापेक्षा एक, रंगीबेरंगी भूमिका साकारल्या आहेत. रोहन मापुसकर यांनी या सिनेमाचं कास्टींग केलं असूम त्यांनी अशी टीम निवडली आहे ज्याना बघूनच प्रेक्षकांचे पैसे वसूल होणार आहेत. अजित साटम, रियाझ इनामदार, साकीब शेख, जिग्नेश पटेल, मिहीर भट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची ही कथा असून रोजच्या जगण्यातील कथानक यातून मांडण्यात आलं आहे. 

कॉमेडीचे बादशाह मानले जाणारे एकापेक्षा एक लोकप्रिय कलाकारांनी या सिनेमात धमाल उडवून दिली आहे. तसेच या सिनेमातील गाणीच आधीच इतकी लोकप्रिय झाली आहे. काही कलाकार पहिल्यांदाच यात काम करणार आहेत. या सर्वच कलाकारांच्या कधीही न पाहिलेल्या भूमिका प्रेक्षकांना यातून बघायला मिळणार आहेत. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणं, त्यांना पैसा वसूल सिनेमा दाखवणं हाच मूळ उद्देश दिग्दर्शकांनी डोळ्यासमोर ठेवला आहे. कॉमेडीसोबतच या सिनेमातून इमोशन, रोमान्स, मैत्री याही गोष्टी बघायला मिळणार आहे. रिअल लोकेशन सिनेमाचं शूटिंग झाल्याने त्यात अधिकच रंगत येणार आहे. सिनेमाचं शूटिंग सुरू असताना कलाकारांनीच इतकं एन्जॉय केलंय की, प्रेक्षक तर सिनेमागृहात पोट धरून हसतील. 

या धमाल सिनेमात भाऊ कदम, कुशल बद्रीके, मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांत केरकर, शशांक शेंडे, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय  बंटावा , बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 

अजय सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा आणि पटकथा त्यांनीच लिहिली आहे. तर खळखळून हसायला लावणारे संवाद प्रियदर्शन जाधव यानी लिहिले आहेत.रोहित नागभीडे आणि मिहीर भट यांनी धमाल संगीत दिलंय.पार्श्वसंगीत आशिष यांनी दिलंय. सिनेमाचं संकलन उज्वल चंद्रा यांनी केलंय.सिनेमटोग्राफी मर्जी पगडीवाला यांनी केलीये. तसेच या सिनेमातील धमाकेदार गाण्यांची कोरिओग्राफी  संतोष पालवणकर यांनी केली. हा चित्रपट आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 

Web Title: 'Loose Control', which has been a no-nonsense control, is displayed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.