लूज कंट्रोल २३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 09:34 IST2018-02-19T04:04:37+5:302018-02-19T09:34:37+5:30
गेल्या काही वर्षात मराठी सिनेमामध्ये कमालीचे बदल होताना चित्रपट रसिकांनी पाहिले. अगदी सहजसोपे वाटणारे रोजच्या आयुष्यावर आधारित कथानक, एखाद्या ...
लूज कंट्रोल २३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
ग ल्या काही वर्षात मराठी सिनेमामध्ये कमालीचे बदल होताना चित्रपट रसिकांनी पाहिले. अगदी सहजसोपे वाटणारे रोजच्या आयुष्यावर आधारित कथानक, एखाद्या गंभीर मुद्द्यावर आधारित कथानक, रंजक कॉमेडी किंवा भयपट. रोजच्या जीवनाची चिंता विसरून खळखळून हसण्यास शिकवणारा लूज कंट्रोल हा मराठी सिनेमा २३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ऑफिसला भेट दिली. यावेळी 'लूज कंट्रोल' मधील नेमकेपणा त्यातील कलाकारांनी उलगडून सांगितला.
अजित साटम, रियाझ इनामदार, साकीब शेख ,जिग्नेश पटेल, मिहीर भट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची ही कथा असून रोजच्या जगण्यातील कथानक यातून मांडण्यात आलं आहे. कॉलेजमध्ये अभ्यास करायच्या दिवसांमध्ये या तिघांनी काय काय करामती केल्या आणि पुढे ते कोणकोणत्या पेचात सापडले हे अतिशय विनोदी धाटणीमध्ये अजय सिंह यांनी लिहिलेल्या कथेतून व प्रियदर्शन जाधव यांनी लिहिलेल्या संवादांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
या धमाल सिनेमात छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची पसंती मिळवलेले व प्रेक्षकांचे लाडके कलाकार भालचंद्र कदम, कुशल बद्रिके यांसोबत मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशांक केरकर, कुशल बद्रिके, ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बनतावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
प्रेम झानगीयानी प्रस्तुत अजय सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा आणि पटकथा त्यांनीच लिहिली आहे तर संवाद प्रियदर्शन जाधव यानी लिहिले आहेत. संगीत रोहित नागभीडे आणि मिहीर भट, पार्श्वसंगीत आशिष, गीत वैभव देशमुख यांचे लाभले आहे . तर सिनेमाचं कास्टिंग रोहन मापुसकर, संकलन उज्वल चंद्रा सिनेमटोग्राफी मर्जी पगडीवाला यांनी केली आहे. तर सिनेमाचे कार्यकारी निर्माता म्हणून त्रिलोक सिंग राजपूत यांनी जबाबदारी पार पाडली आहे.