हे पाहा, शशांक केतकर कुठे आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 13:38 IST2017-02-18T08:08:28+5:302017-02-18T13:38:28+5:30
प्रत्येक व्यक्तीची एक ड्रीम सिटी असते. ही ड्रीम सिटी पाहण्याासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. त्याचबरोबर स्वप्नातील या नगरीला भेट देण्यासाठी ...
.jpg)
हे पाहा, शशांक केतकर कुठे आहे
प रत्येक व्यक्तीची एक ड्रीम सिटी असते. ही ड्रीम सिटी पाहण्याासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. त्याचबरोबर स्वप्नातील या नगरीला भेट देण्यासाठी तो अतोनात प्रयत्न ही करत असतो. अशीच ड्रीम सिटी पाहण्याची इच्छा अभिनेता शशांक केतकर याची पूर्ण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. हो, शशांक सध्या बुडापेस्ट म्हणजेच हंगेरी शहराचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. हो, कारण त्याने नुकतेच हंगेरी येथील काही फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. त्याचबरोबर येथील वातावरण खूपच छान आहे. येथील दोन डिग्री तापमान खरचं झक्कास आहे. येथील थंडी एन्जॉय करत असल्याचे त्याने सोशलमीडियावर पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच खूपच छान, इतकी थंडी, काळजी घे अशा कमेंन्टदेखील त्याला मिळाले असल्याचे दिसत आहे. शशांक हा पर्यटनासाठी पोहोचला आहे की, चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी हे अदयापदेखील कळाले नाही.
शशांकने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. तो होणार सून मी हया घरची या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. या मालिकेतील त्याची श्रीची भूमिका आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. या मालिकेनंतर तो चित्रपटातदेखील झळकला आहे. त्याचा वन वे तिकीट हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत गश्मीर महाजनी, अमृता खानविलकर, नेहा महाजन हे कलाकार पाहायला मिळाले. तसेच नुकताच त्याचा एका मुलीसोबतचा एक फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याची ही चर्चा खूपच रंगत असल्याचे दिसत आहे.
![]()