हे पाहा... बघतोस काय मुजरा कर या चित्रपटासाठी तयार केलेली एक शॉर्ट फिल्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 14:03 IST2017-02-02T08:26:56+5:302017-02-02T14:03:34+5:30

सध्या बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा फारच गाजत आहे. या चित्रपटाचा प्रमोशनचा एक भाग म्हणून एक शॉर्ट फिल्म सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आली आहे.

Look at this ... a short film made for the film, by seeing what Mujra Kar has done | हे पाहा... बघतोस काय मुजरा कर या चित्रपटासाठी तयार केलेली एक शॉर्ट फिल्म

हे पाहा... बघतोस काय मुजरा कर या चित्रपटासाठी तयार केलेली एक शॉर्ट फिल्म

्या बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा फारच गाजत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून 
ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राचं वैभव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गड आणि किल्ले यांची आज काय अवस्था करून ठेवलीय यावर आधारित हा चित्रपट आहे. याच गोष्टीला धरून या चित्रपटाचा प्रमोशनचा एक भाग म्हणून एक शॉर्ट फिल्म सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आली आहे. ही शॉर्ट फिल्म लहान मुलांवर आधारित आहे. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दिलेला संदेश हा खरचं मनाला स्पर्श करणारा आहे. म्हणूनच ही शॉर्ट फिल्म सोशलमीडियावर मोठया प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंती पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, अक्षय टंकसाळे, अनिकेत विश्वासराव, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनिल या कलाकारांचा समावेश आहे. 
                बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटाचा  पोस्टर, टीझर, ट्रेलरबरोबरच त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरचा परिणाम पाहता, औरंगाबादमधील किल्ल्यांना अकरा कोटीचा निधीदेखील मंजूर केला आहे. म्हणूनच या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच गीतकार क्षितीज पटवर्धन आणि संगीतकार अमितराज या दोघांच्या भन्नाट जोडीमुळे या चित्रपटातील गाण्यांना अजून चार चॉंद लागले आहेत. तसेच हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे, सिध्दार्थ महादेवन, आदर्श शिंदे यांनी या गाण्यांना आवाज देऊन मंत्रमुग्ध केलं आहे. त्याचबरोबर  या मराठमोळ्या, ऐतिहासिक चित्रपटाचे  शूटिंग साता-याबरोबरच लंडन येथे चित्रीत करण्यात आला आहे. साता-याचे तीन वाघ म्हणजेच जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे या तिघांचा काहीसा भाग लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे.  या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी मिलिंद जोग यांनी  सांभाळली आहे. हा चित्रपटत पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३ फ्रेबुवारीपर्यत वाट पाहावी लागणार आहे. 




         

Web Title: Look at this ... a short film made for the film, by seeing what Mujra Kar has done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.