हे पाहा... संजय जाधव स्त्री अवतारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 14:29 IST2017-02-25T08:59:50+5:302017-02-25T14:29:50+5:30

  दिग्दर्शक संजय जाधव आता अभिनय करणार असल्याचे तर सर्वानाच माहितीय. परंतु संजय त्याच्या पहिल्याच चित्रपटात एकदम अलग अंदाजात ...

Look at this ... Sanjay Jadhav in women's avatars | हे पाहा... संजय जाधव स्त्री अवतारात

हे पाहा... संजय जाधव स्त्री अवतारात

 
िग्दर्शक संजय जाधव आता अभिनय करणार असल्याचे तर सर्वानाच माहितीय. परंतु संजय त्याच्या पहिल्याच चित्रपटात एकदम अलग अंदाजात प्रेक्षकांना दिसणार आहे. होय संजय जाधव लग्न मुबारक या आगामी चित्रपटात मुस्लिम भूमिकेत दिसणार असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. परंतु आता संजय याच चित्रपटात स्त्रीवेषात देखील त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. संजयला स्त्री व्यक्तिरेखेत सादर करण्याची कमाल केली आहे मेकअप आर्टिस्ट हर्षद खुले याने. हर्षदने आज पर्यंत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचे मेकअप  केलेले आहेत. परंतु संजय जाधव यांचा मेकअप करणे एक आव्हान असल्याचे हर्षदने लोकमत सीएनएक्स सोबत संवाद साधताना सांगितले. हर्षद सांगतोय, मला जेव्हा समजले कि संजय जाधव यांचा मेकअप करायचा आहे तेव्हा थोडा टेन्शन आले होते. कारण त्यांना मुस्लिम व्यक्तिरेखेत मला पेश करायचे होते. शिवाय मला जेव्हा आमच्या दिग्दर्शकांनी संजय दादाला स्त्री वेशात सादर करायला सांगितले तेव्हा मी ते एक चॅलेंज म्हणूनच स्वीकारले. त्यांना काजळ लावण्यापासून ते साडी नेसविण्यापर्यंत सर्व गोष्टी करताना मनात थोडी धाकधूक होतीच. परंतु जेव्हा त्यांचा मेकअप पूर्ण झाला तेव्हा स्वतः संजय दादाने माझे कौतुक केले आणि मला सांगितले कि मी खरच या वेशात स्वतःला ओळखूच शकत नाहीये. एवढेच नाही तर महेश मांजरेकर , मेधा मांजरेकर आणि  सेट वरील सर्वानीच माझे यासाठी कौतुक केल्याचे हर्षदने सांगितले. तर मग आता तुम्हाला लवकरच संजय स्त्री वेशात दिसणार एवढे मात्र खरे

Web Title: Look at this ... Sanjay Jadhav in women's avatars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.